
पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…
मुंबई: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत निवेदन दिले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलावर काही अपवाद वगळता योग्यप्रकारे कारवाई केल्याचा दावा केला. बालहक्क न्यायालयाने संबंधित अल्पवयीन मुलाबाबत निर्णय दिल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाकडे एक अर्ज केला होता. अल्पवयीन मुलाने निर्घृणपणे हे कृत्य केले. त्याचे वय 17 वर्षे 8 महिने आहे. त्यामुळे बालहक्क न्यायालयाच्या कलम 20 नुसार त्याला सज्ञान समजून हे प्रकरण कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंती पोलिसांनी सुरुवातीलाच केल्याचे देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले. निर्भया प्रकरणानंतर 17 वर्षांवरील व्यक्तीने थंड डोक्याने गुन्हेगारी कृत्य केल्यास त्याला सज्ञान म्हणून वागणूक देण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी पावले उचलत सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसस करण्यात आले. या अहवालात समोर आले की, ज्यावेळी अल्पवयीन मुलाने गाडीचा ब्रेक मारला, पोर्शे कार ज्या स्पीडला लॉक झाली तेव्हा गाडीचा वेग 110 KMPH इतका होता. त्यामुळे संबंधित मुलगा हा अत्यंत वेगाने गाडी चालवत होता, हे स्पष्ट झाले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. अल्पवयीन मुलाच्या घरापासून तो बारमध्ये जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. त्याने ज्या बारमध्ये जाऊन दारु प्याली, तेथील सीसीव्ही फुटेज आणि बिलही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याकडे कायदेशीर आणि तांत्रिक पुराव्यांची कोणतीही कमतरता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी ससून रुग्णालयात धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने कसे बदलण्यात आले, यावरही प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळले नाही, असे दिसून आले तेव्हा पोलिसांना स्ट्राईक झालं काहीतरी गडबड आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले. हे डीएनएन नमुने रक्ताच्या सॅम्पलशी मॅच करुन पाहिले तेव्हा अल्कोहोल टेस्टसाठी देण्यात आलेले रक्त वेगळ्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन ससूनमधील डॉक्टरांना अटक केली. त्यापैकी एका डॉक्टरने 3 लाख रुपये घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याची कबुली दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे पोर्शे अपघातप्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रचंड टीका झाली होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ‘पोलिसांची पहिली चूक कुठे झाली तर अपघातानंतर मुलाला पहाटे 3 वाजता पोलिस ठाण्यात आणण्यात आले तेव्हा लगेच मेडिकलला पाठवायला पाहिजे होते. पण पोलिसांना त्यांनी सकाळी साडेआठला मेडिकलला पाठवले. नॉर्मली पोलिस अपघातानंतर 304 कलम लावतात, पण तेव्हा पोलिसांनी 304 अ कलम लावले. मात्र, नंतर वरिष्ठांनी 304 अ कलम लावले. त्याचा रेकॉर्ड केस डायरीत आहे. यावेळी आपले कर्तव्य न बजावणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.’
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
श्रीमंत-गरिबाला समान न्याय दिला पाहिजे, ससून रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे न्यायाला दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमं आणि लोकांनी ओरड केली म्हणून कारवाई केली असं नाही. तर, दहा वाजता गुन्हा दाखल केल्याबद्दल जे झालं त्याची संपूर्ण नोंद पोलीस डायरीत आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल केल्यानंतर मेडिकलला पाठवणे आणि वरिष्ठांना न सांगता गुन्हा दाखल करणे या दोन चुका पोलिसांकडून झाल्या, असे फडणवीसांनी सभागृहात मान्य केले.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडत प्रश्न उपस्थित केले. पुण्यातील हिट अँड रन ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, यातील आरोपीने मद्य प्रशान केलेले होते. पण या आरोपीला पोलिस स्टेशनमध्येच बर्गर, पिझ्झा दिला गेला. या आरोपीवरती काय कारवाई केली याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी प्रभू यांनी केली होती. प्रभू यांच्या मागणीवर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.
पुणे पोर्शे कार अपघाताची घटना घडली, तेव्हा या आरोपीला मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुरुवातीला 304 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच दिवशी 304 चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दिवशी जी बाजू मांडली ती माझ्याकडे आहे, याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ अपील दाखल केलं. तसेच, आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला, तो त्याच्या वडिलांशी देखील मॅच करण्यात आला. मात्र, तो मॅच होत नव्हता. त्यामुळे, पोलिसांनी तपासाअंती डॉक्टरांना अटक केली. त्यात 3 लाख रुपये एकाने घेतल्याचे कबुल करण्यात आले आहे. आरोपी पहिल्या आणि दुसऱ्या बारमध्ये बसला होता, त्याचे बिल आणि सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केले आहे. याशिवाय आरोपीच्या वडिलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
पब्ज आणि बारच्या मॅनेजरसह इतरांवरही गुन्हा दाखल झाला आहे, चौकशी न करता त्यांनी लिकर सर्व्ह केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकही केली. त्या आरोपीचे आजोबा यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना झाल्यानंतर वरिष्ठांना कळवलं नाही, त्यामुळे संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील 70 पबवरती कारवाई करुन लायसन्स रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे लायसन्स आहेत, त्यांच्याठिकाणी कॅमेरे लावले आहेत. तसेच, बारमध्ये येणाऱ्यांचे वय तपासायलाही सुरुवात झाली आहे. जर वय कमी असताना त्याला दारु सर्व्ह केलं तर लायसन्स रद्द आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही फडणवीसांनी थेट सभागृहातून दिला आहे.
पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा: उच्च न्यायालय
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
अगरवाल दांपत्यासह मकानदाराची येरवडा कारागृहात रवानगी…
पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
Video: विशाल अगरवाल याच्या महाबळेश्वरमधील हॉटेलवर बुलडोझर…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…
पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक…
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…
पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने केला खुलासा…
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…
पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…
पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…
ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…
पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…
पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….
पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

