
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँग गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे. पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर आता खुद्ध अल्पवयीन आरोपीच्या आईनेच खुलासा केला आहे.
पुणे पोर्श अपघात प्रकरणानंतर एका संतापजनक रॅप सॉन्गचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे रॅप साँग करणारा अपघात करणारा अल्पवयीन मुलगा असल्याचे बोलले जात होते. पण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या आईने व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झालेला रॅप व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच माझ्या मुलाला वाचवा अशी विनंतीही आरोपीची आई पोलिसांना करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
काय आहे रॅप
करके बैठा मै नशे… इन माय पोर्शे
सामने आया कपल मेरे, अब वो है निचे
साऊंड सो क्लिंचे, सॉरी गाडी चढ आप पे
17 साल की उमर, पैसे मेरे बाप के
1 दिन में मिल गयी मुझे बेल, फिर से दिखा दुंगा सडक पे खेल
प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार
रॅप गाण्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘मला जामीन मिळाला आहे, मी तुम्हाला पुन्हा रस्त्यावर खेळ दाखवतो. माझ्यासोबत चार मित्र होते, मी नशेत धुंद होतो. ते जोडपे माझ्या पोर्शसमोर आले. मला एका दिवसात जामीन मिळाला. मी पुन्हा रस्त्यावरचा खेळ दाखवीन.’
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द केला आहे. बुधवारी तब्बल 8 तासांहून अधिक काळ या मंडळाची सुनावणी झाली. अपघातानंतर मुलाला तात्काळ जामीन मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुण्यात जाऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. मुलाचे वय 17 वर्षे 8 महिने असल्याने निर्भया प्रकरणानंतर सुधारित आदेशानुसार आरोपी अल्पवयीन असल्यास काही प्रकरणांमध्ये आरोपीच्या माहितीच्या आधारे पोलिस कारवाई करू शकतात.
पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये अल्पवयीन मुलाविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. बाल न्याय मंडळाने आता त्याचा जामीन रद्द करून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

