मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना सुरू…

मुंबई (संदीप कद्रे): मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन राधिका रस्तोगी (भा.प्र.से.) प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडले. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) अपर पोलिस महासंचालक, व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा योगेश देसाई, कारागृह उपमहनिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा मुंबई तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा […]

अधिक वाचा...

महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…

मुंबईः भायखळा कारागृहाने विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. यापुढे कारागृहातदेखील महिला कैद्यांचं मनोरंजन होणार आहे. कारण, महिला कैद्यांच्या मनोरंजनासाठी ‘FM रेडीओ सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहाने विशेष उपक्रम आयोजित केला आहे. भायखळा जिल्हा कारागृह व मुंबई जिल्हा महिला कारागृहामध्ये पुरूष व महिला कैद्यांच्या मनोरंजनाकरीता ‘FM रेडीओ सेंटर’ […]

अधिक वाचा...

येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…

पुणे : येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असे कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका […]

अधिक वाचा...

संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेले चौघे पकडले; जाणार होते…

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेल्या चार सराईत आरोपींना पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणामध्ये चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पळालेले चारही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या मार्गावर होते. यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा निकाल लागणार असल्यामुळे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. संगमनेर शहर पोलिस ठाण्यालगतचा कारागृह फोडून गंभीर गुन्ह्यातील चार […]

अधिक वाचा...

संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पळाले…

संगमनेर (अहमदनगर): संगमनेर कारागृहातून चार कैदी पळून गेल्याची घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. संगमनेर तहसील कार्यालय परिसरात संगमनेर शहर पोलिस ठाणे तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. शहर पोलिस ठाण्याला लागूनच कारागृह आहे. या कारागृहाचे गज कापून चार कैदी पळून गेले. पळून गेलेल्या चौघांचा पोलिसांनी शोध […]

अधिक वाचा...

येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…

पुणे (संदीप कद्रे): दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले. अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता […]

अधिक वाचा...

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

मुंबई: बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल (वय ६५) यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्या प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील खार भागात अभिनेते दलीप ताहिल कार चालवत असतानाच त्यांनी एका रिक्षाला धडक दिली होती. ही घटना 2018 मध्ये घडली होती. रिक्षात असलेली महिला जखमी झाली होती. […]

अधिक वाचा...

ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…

पुणे: ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी घेतला आहे. या समितीला 15 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या चौकशी समितीत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचे […]

अधिक वाचा...

कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…

पुणे (संदीप कद्रे): गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागातील अधीक्षक, कारागृह मध्यवर्ती कारागृह, गट –अ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातंर्गत गृह विभाग, शासन निर्णय ०६.०६.२०१५ अन्वये गठीत नागरी सेवा मंडळाची बैठक दिनांक ०८.०९.२०२३ रोजी पार पडली. नागरी सेवा मंडळाच्या सदर बैठकीतील शिफारशीनुसार अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-१/ अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर कार्यरत […]

अधिक वाचा...

कारागृहातील नवऱ्याच्या कैदी मित्राच्या प्रेमात पडली पत्नी अन् पुढे…

नवी दिल्ली : कारागृहात पतीला भेटायला येणारी पत्नी कारागृहातील दुसऱ्याच कैद्याच्या प्रेमात पडली होती. संबंधित प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील कारागृहात ही प्रेम कहाणी सुरू झाली होती. अमरोहा जिल्ह्यातील एका कैद्याने पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!