
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातात युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. आरटीओकडूनही अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीला सज्ञान झाल्यानंतरही लगेच ड्रायव्हिंग लायसन मिळणार नाही. ड्रायव्हिंग लायसनसाठी त्याला २५ वर्षांपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यात अपघात विषयावर निबंध लिहिणं, ट्राफिट कंट्रोलरसोबत १५ दिवस वाहतूक नियोजन करण्या याचा समावेश होता. अल्पवयीन वाहनचालक असल्याचे गुन्हेही सातत्याने समोर येत असतात. त्याबाबतही सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार वाहनचालक अल्पवयीन असल्यास त्याला 25 हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्याला 25 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही. अल्पवयीनाला वाहन देणाऱ्या वाहनमालकाची नोंदणी रद्द होणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नवा नियम 1 जूनपासून लागू होणार आहे. सरकारी सेवेतून जुनी वाहने रद्द केली जाणार आहेत. तर अल्पवयीन चालकावरही कठोर कारवाई केली जाईल. ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
धनिकपुत्र पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना चिरडले. अल्पवयीन मुलाने जी पॉर्श गाडी चालवली ती बंगळुरूहून पुण्यात आणण्यात आली होती. टॅक्स न भरल्यामुळे आरटीओने या गाडीची नोंदणी केली नव्हती, तरीही गाडी रस्त्यावर फिरत होती.
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

