पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला १५ तासांत जामीन मंजूर झाला आहे. दोन आयटी इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युवकाला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पुण्यात भरधाव वेगाने धडक दिल्याने दोन आयटी इंजिनियरचा बळी घेतला आहे. पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आय टी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक युवक आणि युवतीचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातानंतर आरोपी वेदांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण जमावाने चोप देऊन त्यास पोलिसांच्या हवाली केले होते.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने वाहनचलाकाला पकडून चोप दिला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने त्यास अटक करण्यात आली होती. वाहनचालक हा 17 वर्षाचा आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या,दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भरधाव वेगाने कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला. त्यामुळे, अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन उशीरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि या अपघाताचा तपास मोठ्या स्तरावर केला जाईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

अल्पवयीन वाहनचालाकवर IPC 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्युला कारणीभूत होणे या अनुषंगाने 304 दाखल करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी आरोपी हा दारु पीला होता असा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्याआधीच न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेला अनिस दोन दिवसांपूर्वीच परदेशातून पुण्यात परतला होता. पार्टीसाठी मैत्रीसोबत गेला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. नंबर नसलेली आणि परवाना नसताना तो पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता. याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!