सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पण, कोट्यवधीचा तोटा झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून दोन मुलं आणि पत्नीला संपवून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बार्शी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात योगेश पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळेत शिकवता शिकवता त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याची सवय लागली. त्यांनी थोडे थोडे करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत गेले. पण, शेअर मार्केट मध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांच्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

योगेश पाटील यांनी झालेल्या कर्जामुळे आपल्या पत्नीला आणि दोन चिमुकल्यांना आईस्क्रीममधून अत्यंत जहाल विष दिलं. विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच तडफडून तिघांचाही मृत्यू झाला. कुटुंबातील सर्वांचा श्वास थांबल्याची खात्री पटल्यावर योगेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश पाटील यांच्यासह पत्नी आणि मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

पुणे! हिंजवडीमधील IT इंजिनिअरने संपवलं जीवन; चिठ्ठीत दोन महिलांचे नावे…

पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…

नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…

पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…

कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!