पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

पुणे : पुणे शहरात हिट अँड रन प्रकरणात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली असून, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत राहिले आहे. अल्पवयीन धनिकपुत्राने त्या रात्री दारूचे बील ४८ हजार भरल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी (ता. १९) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे अश्विनी कोष्टा, अनिस अवधिया या जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

धनिकपुत्राच्या अल्पवयीन मुलाने विना नंबरची पोर्शे कार वेगाने चालवली होती. त्याच्याकडे वाहन चालविण्याचे लायसन नव्हते. शिवाय, दारूचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोर्शे कारची किंमत तब्बल अडीच कोटी तर दारूचे बील ४८ हजार रुपये भरले आहे. धक्कादायक म्हणजे पबमधून बाहेर आल्यानंतर मोटार 200 च्या स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला न्यायालयात सादर केले तेव्हाही त्याने मद्यप्राशन केल्याचे सांगितले. तसेच तो अरुंद रस्त्यावर, विना नंबरप्लेटची गाडी भरधाव वेगाने चालवत होता, या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. पण न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन दिला, असे पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात ज्यावेळी ही घटना आमचे निदर्शनास आली त्याचवेळी या प्रकरणात 304 आयपीसीचे कलम वाढवण्यात आले. 304 आयपीसी म्हणजे यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे. त्यामुळे बालन्याय कायद्यातील कलम 2 मध्ये तरतूद आहे की, एखादा गुन्हा नृशंस असल्यास अल्पवयीन गुन्हेगाराविरोधात सज्ञान म्हणून खटला चालवावा. त्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात दोन अर्ज दिले. एका अर्जात नृशंस कृत्य असल्यान आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवावा,अशी मागणी होती. तर दुसऱ्या अर्जात निर्णय होत नाही तोपर्यंत आरोपींना 14 दिवसांसाठी रिमांड होममध्ये पाठवा, अशी मागणी होती. मात्र, न्यायालयाने या दोन्ही मागण्या फेटाळल्या आणि जामीन दिला. जामीन देणे हा न्यायालयाचा अधिकार आहे, आमच्या अधिकारात ती गोष्ट येत नाही. पण आरोपीला जामीन मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आम्हालाही हा जामीन मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात अपील केले, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!