पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणी धनिकपुत्र अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आहे.

ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट बदलल्याने आता तपासात अडथळा निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या शरीरात दारुचा अंश होता की नव्हता? यासाठी ब्लड रिपोर्ट महत्त्वाचे होते. अपघाताच्या घटनेनंतर लगेच घेतलेल्या ब्लड रिपोर्टमध्ये बदल करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी पुन्हा दुसरे ब्लड सँपल घेतले. मात्र तोपर्यंत बराच काळ गेल्याने ते रिपोर्ट निगेटिव आले आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आम्ही फॉरेन्सिक लँबला पाठवलेला रिपोर्ट ही निगेटिव आला आहे. कारण तो मद्य प्राशन केल्यानंतर बराच काळ उलटून गेल्यानंतर घेतला होता. तो रिपोर्ट पण निगेटिव आलाय. तसेच आम्ही मुळात तो रिपोर्ट हा डीएनए टेस्टसाठी घेतला होता. अल्पवयीन आरोपीचे १९ तारखेला जे ब्लड सँपल आले ते दुसऱ्याचे बल्ड सँपल असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपल घेतले ते फेकुन दिले, दुसऱ्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्या अल्पवयीन आरोपीचे नाव वापरले अशी माहिती पोलिसांनी दिली. हे रिपोर्ट बदलण्याचे काम डॉक्टर श्रीहरी हरनोर याने केले. त्याला डॉक्टर अजय तावरे याने ब्लड रिपोर्ट बदलण्यास सांगितले.

डीएनए रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्लड सँपल दुसरीकडे पाठवल्यानंतर त्यात दुसऱ्या ठिकाणी विशाल अगरवाल याच्या डीएनएशी रिपोर्ट मॅच झाले. मात्र, ससूनमधील रिपोर्टमध्ये फेरफार केल्याची बाब पुणे पोलिसांच्या लक्षात आली. आता या प्रकरणात दुसरे ब्लड सँपल कोणाचे? का वापरले? याचा शोध घेतला जात आहे. तसेच डॉक्टरने अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपल कचऱ्यात टाकल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे.

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!