
Video News: पोलिसकाका टॉप १० क्राईम घडामोडी….
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या
सांगली: सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज निकम हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सूरज निकमच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना पकडलं
पुणे: पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना भोर-पोलिसांनी वडगाव डाळ हद्दीतून सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; सात ठार
जालना : जालना जिल्ह्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला असून, सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई गुन्हे शाखेकडून नौदलाच्या लेफ्टनंट कमांडरला अटक
मुंबईः मुंबई गुन्हे शाखेने नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर अधिकाऱ्याला मानवी तस्करीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विपिन कुमार डागर असे या लेफ्टनंटचं नाव असून आयएनएस केरळमधून यांना अटक करण्यात आली आहे.
जालना येथे धारदार शस्त्राने युवकावर वार करत खून
जालना : जालना शहरातील चंदनझिरा भागात एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबईत आईस्क्रिममध्ये आढळलेल्या मानवी बोटाचे गूढ उलगडलं
मुंबई : मालाड परिसरात एका आईस्क्रिम कोनमध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं रहस्य उलगडले आहे. आईस्क्रिम फॅक्टरीत कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्याचे हे बोट असल्याचे डीएनए चाचणीतून निष्पन्न झाले आहे.
बारामतीमध्ये बैलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून गोळीबार
बारामती : शर्यतीच्या बैलाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून एकावर गोळीबार केल्याची घटना बारामती तालुक्यातील निंबुत येथे घडली आहे. यामध्ये रणजीत एकनाथ निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.
नीट प्रकरणातील लातूरचा आरोपी गंगाधर याला सीबीआयकडून अटक
लातूर: नीटमध्ये गुणवाढ करुन देण्याचे आमिष दाखवून पालकांना गंडविणारा आरोपी गंगाधर याला सीबीआयने अटक केली आहे.
डेहराडून येथे अनैतिक संबंध लपवण्यासाठी तिघांचा खून
डेहराडून : अनैतिक संबंध लपविण्यासाठी एकाने आपली घटस्फोटित प्रेयसी आणि तिच्या 15 वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
भिकाऱ्याला खाऊ घातले, कपडे दिले आणि गाडीत बसवून पेटवून दिले
आग्रा (उत्तर प्रदेश): विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आरोपीने एका भिकाऱ्याला खाऊ घातले, कपडे दिले आणि गाडीत बसवून पेटवून दिले होते. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

