
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बेदरकारपणे महागडी पोर्शे कार चालवून एक युवक आणि युवतीचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालवणारा धनिकपुत्र हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे.
बाल हक्क न्यायालयाने बुधवारी (ता. २२) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आरोपी अल्पवयीन आहे. त्याला प्रौढ ठरवून खटला चालवावा अशी मागणी होत आहे. कारण प्रौढ ठरवून खटला चालवल्यास त्याला अधिक कठोर शिक्षा होऊ शकते. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यातील तरतुदींच्या आधारे काही लाभ मिळणार आहेत.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातील असा असणार दिनक्रम…
– सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आवराआवर करून नाष्टा दिला जातो. नाष्ट्याला पोहे, उपीट, अंडी, दूध असतं.
– 11 वाजता प्रार्थना होते
– 11 ते 1 इंग्रजी आणि वेगवेगळ्या विषयाच्या शिकवण्या
– 1 ते 4 डॉर्मेटरीमध्ये आराम
– 4 वाजता पुन्हा नाष्टा
– 5 वाजेपर्यंत टीव्ही
– 5 ते 7 व्हॉलीबॉल-फुटबॉल खेळायला सुट्टी
– 7 नंतर जेवण
– 8 वाजता झोपण्यासाठी डॉर्मेटरीमध्ये रवानगी
जेवणासाठी सात्विक पौष्टिक आहाराचे मेन्यू. यात पालेभाज्या, चपाती, वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यू असतात.
प्रौढ म्हणून खटला कधी चालणार…
कायद्यानुसार, आरोपी प्रौढ आहे का, हे सिद्ध करण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्या केल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जातो. त्या चाचण्या करण्यासाठी न्यायालयाला काहीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे आजच प्रौढ म्हणून कोणताही निकाल देता येणार नाही, अशी भूमिका बाल हक्क न्यायालयाने घेतली आहे.
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

