प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

बीड : एका विधवा महिलेवर दोघांनी चालत्या जीपमध्ये प्रियकरासमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घढली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरात राहात आहे. दरम्यानच्या काळात पीडित महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत त्या व्यक्तीसोबत मागील एक वर्षापासून राहात आहे.

पीडित महिला (वय २६) 4 ऑगस्ट रोजी रोडवरुन पायी जात असताना तिथे चारचाकी मोटार आली. त्या मोटारीतून सुरेश लंबाटे खाली उतरला आणि पीडित महिलेला बसण्यास सांगितले. त्यामुळे महिला मोटारीत बसली. मोटारीत सुरेश लंबाटे याचा भाऊ अमोल नामदेव लंबाटे आणि बापूराव हावळे बसले होते. मोटार काही अंतरावर जाताच अमोल लंबाटे याने महिलेला अचानक मारहाण केली. तसेच तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर अमोल आणि बापूराव यांनी जबरदस्तीने धावत्या जीपमध्ये बलात्कार केला. सोबतच पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पीडिता महिलेला मोटारीत बसवून तिच्यावर अत्याचार केल्यावर थेट सुरेश लंबाटे याच्या सात्रापोत्रा गावातील घरी आणण्यात आले. याचवेळी तिथे सुरेश लंबाटेची पत्नी सविता थांबलेली होती. मोटार घरासमोर येताच सुरेश आणि सविता या दोघांनी मिळून पीडित महिलेस मोटारीच्या खाली ओढले. तसेच सविताने प्लास्टिक पाईप आणि चप्पलने पीडित महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पीडित महिलेची सुटका करत, तिला बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश नामदेव लंबाटे, अमोल नामदेव लंबाटे, बापूराव हावळे व सविता सुरेश लंबाटे (सर्व रा. सात्रापोत्रा, ता.बीड) यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…

One thought on “प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

  1. 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳ही, वेबसाईट आणि त्यांचा व्हाट्सअप गृप खूप-खूप महत्त्वपूर्ण आहे.💐💐💐☝️☝️☝️

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!