IPS अधिकारी राहुल बन्सल लाच प्रकरणात अडकले; मुलाखतीदरम्यान म्हणाले होते…

नवी दिल्ली : नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना तयारीदरम्यानच्या मुलाखतीदरम्यान ५०० रुपयांची लाचही घेतली जाऊ नये, असे सांगणारे IPS अधिकारी राहुल बन्सल सध्या एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात अडकले आहेत. २०२२ च्या तुकडीचे छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी राहुल बन्सल यांच्यावर सायबर फसवणूक प्रकरण सोडविण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. नागरी सेवेच्या तयारीदरम्यानचा राहुल […]

अधिक वाचा...

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट IPS पदापर्यंत मजल मारली अन् अटक झाली…

हैद्राबाद: एका महिला ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी ट्रेनी IPS अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे खाकी वर्दी घालून देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याचे करियर सुरू होण्याआधीच त्याला अटक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित ट्रेनी अधिकाऱ्यावर आपल्या सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या उदय कृष्णा रेड्डी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे […]

अधिक वाचा...

प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप; कंडोम फेकले अन्…

हैदराबाद (तेलंगणा): हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) मधील एका प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध एका महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा विनयभंग, मारहाण आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे. पीडितेच्या आरोपानुसार, आरोपीने तिला जबरदस्तीने त्याच्या खोलीत नेल्यानंतर मारहाण केली, तिच्या संमतीशिवाय तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि […]

अधिक वाचा...

विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या आठवणी केल्या जाग्या; मीच खातोय अधिक शिव्या…

नागपूर : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हॉटेल ताजची पाहणी केली होती, असा मोठा खुलासा नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केला आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी अनुभवही सांगितले. मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आणि त्यावेळी दक्षिण मुंबईचे डीसीपी म्हणून काम पाहात असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. […]

अधिक वाचा...

महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…

हैदराबाद: सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्यावर एका महिला प्रशिक्षणार्थी ips अधिकाऱ्याचा लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि पतीला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ येथे स्वाट टीम (नगर) आणि लिसाडी गेट पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे, अर्धवट तयार पिस्तुले, शस्त्रनिर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…

भुवनेश्वर: ओडिशा केडरचे IPS अधिकारी सीए रामदास (चौधर अभिजीत रामदास) यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. ओडिशा पोलिस दलात अधिकारी म्हणून फील्ड पोस्टिंग मिळवण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ओडिशा केडरच्या अभिजीत रामदास यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला. भुवनेश्वरचे […]

अधिक वाचा...

IPS विनायक भोसले यांनी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश…

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात लिसाडी गेट पोलिस आणि स्वाट टीमने संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ तयार पिस्तुले, ५ अर्धवट तयार पिस्तुले, मॅगझिन, शस्त्रनिर्मितीचे सुटे भाग आणि मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी विनायक […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी वादावर दिलं स्पष्टीकरण…

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्याने पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांच्यावर पोस्ट लिहून थेट नोकरीचा राजीनामा देऊन संघात भरती होण्याचा खोचक सल्ला दिला होता. त्यानंतर या सगळ्या वादावर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांनी […]

अधिक वाचा...

राज्यातील DYSP दर्जाच्या ११५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबई : राज्य सरकारने पोलिस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. गृह विभागाने सोमवारी (ता. २२) काढलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, आयुक्तालये आणि विशेष शाखांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली असून तर काही अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!