लष्कर पोलिसांनी जुगार अड्डयावर टाकला छापा; अकरा ताब्यात, पाहा नावे…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील लष्कर पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला असून, अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, 1,42,240/- रू किंमतीची रोख रक्कम व जुगाराचा माल पोलिसांनी जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

राजेश जनार्दन श्रीगिरी यांच्या मालकीच्या बालाजी सोशल क्लब १७७/२४, भिमपुरा, कॅम्प, येथे तीन पत्याचा फ्लॅश नावाचा जुगार रोख रक्कम व प्लास्टिक कॉईनवर सुरु असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतले. बालाजी सोशल क्लबचे मालक राजु जर्नादन श्रीगीरी यांनी हा क्लब खेळण्यासाठी उपलब्ध करून दिला असल्याने महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रक्कम रु. 1,35,000/- रूपये किंमतीचा जुगाराचा माल व 7240/- रोख अशी एकूण 1,42,240/- रू किंमतीची रोख रक्कम व जुगाराचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले पुढीलप्रमाणे…
१) बबन जगन्नाथ मानकर रा. मानकरवाडी ता. इंदापुर जि. पुणे.
२) गणेश तुकाराम भोसले, वय ४२ वर्षे, रा. संतोषी माता मंदिर, आळंदी मरकळ रोड पुणे.
३) बापू पोपटराव साळुंखे, वय ४४ वर्षे, रा.पारगाव, ता. दौंड जि. पुणे ४) दिपक गोरख गुंजाळ, वय ३५ वर्षे, रा. सोनवाडी, अहमदनगर
५) निलेश काशिनाथ देशमुख, वय ३६ वर्षे, रा. सिद्धेश्वर कुरवली, ता. खटाव, जि. सातारा.
६) जय तुकाराम जगताप, वय ४१ वर्षे, रा. नांदेड धायरी, बारामनिमाळ, पुणे.
७) गणेश ज्ञानेश्वर साठे, वय ४० वर्षे, रा. पिंपळे निलख गावठाण, मारूती मंदिरासमोर, पुणे.
८) प्रेमकुमार संजयसिंग, वय ३५ वर्षे, रा. हडपसर, माळवाडी, पुणे.
९) राहूल भिमराव मसुरकर, वय ३५ वर्षे, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे.
१०) अभिजीत भिमराव सोणवणे, वय ५० वर्षे, रा. घोरपडीगाव, पुणे.
११) राजु जर्नादन श्रीगीरी, १७७/२४, भिमपुरा, कॅम्प, पुणे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापुढे अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…

निलेश घायवळ याची ‘8055 BOSS’ अशी नंबर प्लेट असलेली गाडी जप्त…

पुणे! तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं, थेट कोयत्याने वार…

पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…

पुणे! दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पोलिसांनी उतरवला माज…

One thought on “लष्कर पोलिसांनी जुगार अड्डयावर टाकला छापा; अकरा ताब्यात, पाहा नावे…

  1. अरे मित्रा
    हा खेळ तीन पत्ती जुगाराचा खेळ नसून हा 13 पत्ती रम्मी चा मनोरंजनाचा खेळ खेळत होते, आणि हे खेळ खेळणारे सगळे मेंबर माझे बालाजी सोशल ग्रुप मधले आहे, याचा मी पूर्णपणे पुरावा देऊ शकतो,, तरी माझी आपणांस नम्र विनंती आपण हा पुरावा पाहावा आणि या सगळ्या विषयात पारदर्शकता ठेवावी, आणि ही पारदर्शकता आपण ठेवताल हिच आपल्याकडून प्रमाणिक इच्छा आणि पुन्हा एकदा विनंती ..🙏🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!