पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

पुणे : कल्याणीनगरमध्ये रविवारी (ता. १९) पहाटे झालेल्या अपघातात अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील, हॉटेलचे मॅनेजर आणि त्याला दारु पुरवणाऱ्यांसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे शहरातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघात आणि या प्रकऱणी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर, दोन हॉटेल चालकांवर मिळून तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ‘पुणे पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ३०४ अंतर्गत कलम लावले आहेत. हा आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, आमची मागणी फेटाळली आहे. या विरोधात आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार आहोत.’

पालकांनी एवढी महागडी गाडी दिली, त्याला दारू पिण्यास परवानगी दिली म्हणून त्याच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि मॅनेजर याच्या विरोधात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कसूर सोडली नसून कायद्यानुसार सर्व प्रकिया पूर्ण करण्यात आली आहे. एसीपी दर्जा अधिकारी या केसचा तपास करत आहे. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पब आणि बार याच्या वेळेची आम्ही अंमलबजाणीबाबत काम करत आहोत. अनेक सुधारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक झाली आहे. ट्रॅफिक, ड्रिंक अंड ड्राईव्ह बाबत सगळी चर्चा झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत पण चर्चा सुरू आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास सोपवला आहे. आरोपीला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. आरोपीने दारू प्यायली होती, दारु पिताना सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. पुरावे आमच्याकडे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपघाताचा तपास गुन्हे शाखेकडे पाठवला आहे. सीसीटीव्ही फूटेज गोळा केले असून तपास केला जात आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही असे नाही, पोलिसांना जे कायदेशीर अधिकार आहेत त्यानुसार कारवाई केली जात आहे. कल्याणीनगर परिसर आणि पुण्यात जे पबचे नियम आहेत. रात्री उशिरापर्यंत चालू राहतात त्याबद्दल अनेकदा कारवाई झाली आहे. पबच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी, कमी वयाच्या मुलांना मद्य पुरवठा करण्याच्या मुद्द्यांवर आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि संबंधित विभागांसोबत चर्चा झाली आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

अपघातानंतर बिल्डरचा मुलगा असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता पोलिस आयुक्तांनी असे काहीही घडले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पोलिसांनी कायद्यानुसार काम केले. मी स्पष्ट सांगेन की पोलिसांकडे जे अधिकार होते त्याचा वापर केला. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, दबावाच पोलिसांनी काम केले नाही यासाठी पब्लिक डिबेटला तयार आहे. कोणताच दबाव नाही, हस्तक्षेप नव्हता असेही त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!