गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन…
गडचिरोली (उमेशसिंग सुर्यवंशी): गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जिल्ह्यातील 51 व्या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
पोलिस संकुल अहेरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस उप-रुग्णालयाचे तसेच पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ यासोबतच “एक गाव एक वाचनालय” अंतर्गत रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच गडचिरोली पोलिस दलाच्या “पोलिस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्रातील जनतेचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने पोस्टे मुलचेरा येथे पोलिस दादालोरा खिडकीचे स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन तसेच भव्य जनजागरण मेळावा पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपविभाग अहेरी अंतर्गत पोस्टे मुलचेरा हद्दीतील एकुण 600 ते 700 च्या संख्येने नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यासोबतच वाचनालय उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ अधिकार्यांनी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. तसेच उपस्थित नागरिकांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले असुन त्यात 10 शालेय विद्यार्थींनींना सायकल, 05 महिलांना धुररहीत शेगडी इत्यादी साहित्यांचे व उपस्थित नागरिकांना 300 हुन अधिक विविध शासकिय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.
सदर मेळावा प्रसंगी पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, पोस्टे मुलचेरा येथील सर्व अधिकारी/अंमलदार यांनी कम्युनिटी पोलिसिंगचे काम चांगले केले असुन, येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याकरीता यापुढे जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता येईल यादृष्टीने पोस्टे मुलचेरा येथे पोलिस दादालोरा खिडकीचे नवीन कार्यालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच नवीन वाचनालयाचा येथील नागरीकांनी/विद्यार्थांनी परिपुर्ण फायदा घ्यावा व वाचनालयातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात येऊन आपल्या आई वडीलांचे तसेच गावाचे नाव उज्वल करावे. यासोबत पोलिस अधीक्षकांनी 250 पुस्तके वाचनालयाला भेट दिली.
गडचिरोली प्रशासनाकडून आतापर्यत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 551, नर्सिंग असिस्टंट 1237, हॉस्पिटॅलिटी 323, ऑटोमोबाईल 276, ईलेक्ट्रीशिअन 201, सेल्समॅन 05, कंपनी रोजनदारी 155, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 384, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52 असे एकुण 3268 गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 174, कुक्कुट पालन 585, बदक पालन 100, शेळी पालन 177, शिवणकला 277, मधुमक्षिका पालन 53, फोटोग्राफी 65, सॉफ्ट टाईज 70, एमएससीआयटी 231, वाहन चालक 592, भाजीपाला लागवड 1395, पोलिसभरती पुर्व प्रशिक्षण 1062, टु व्हिलर दुरुस्ती 134, मत्स्यपालन 112, वराहपालन 10, फास्ट फुड 130, पापड लोणचे 59, कराटे प्रशिक्षण 48 असे एकुण 5274 युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर विविध उद्घाटन भव्य जनजागरण मेळाव्याच्या कार्यक्रमास पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड, तालुका कृषी अधिकारी मुलचेरा तुषार पाटील हे उपस्थित होते. सदर दोन्ही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोस्टे मुलचेराचे प्रभारी अधिकारी अशोक भापकर, पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि. मनोज काळबांधे, विशेष अभियान पथक प्राणहिता चे प्रभारी अधिकारी सपोनि. योगीराज जाधव व पोलिस अधिकारी व तसेच नागरी कृती व पोलिस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; पाहा यादी…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…