मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…
मुंबईः मंत्रालयात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मेट्रिमोनिअल साईटवरून जोडीदार शोधणं महागात पडले असून, तिची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला या मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. योग्य जोडीदाराच्या […]
अधिक वाचा...खंडणीची मागणी करणाऱ्या दोन महिलांना मुंबईत अटक; डोशात उंदीर सापडल्याचा बहाणा…
मुंबईः बोरिवली पश्चिमेकडील ‘राधाकृष्ण हॉटेल बँक्वेट फास्ट फूड’च्या मालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बोरिवली पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या महिलांनी हॉटेल व्यावसायिक जय शाह (वय ४४) यांच्याकडून आधी १ लाख रुपये उकळले आणि त्यानंतर आणखी ६ लाखांची मागणी केली होती. मानसी आचार्य (वय ३६) आणि किंजल भाटिया (वय २९) अशी […]
अधिक वाचा...मिठी नदीतील गाळ काढण्याचा ६५ कोटी रुपयांचा घोटाळा; डिनो मोरियाची सहा तास चौकशी…
मुंबईः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, अभिनेता डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी सहा तास ६ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी, डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. […]
अधिक वाचा...माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर; तब्बल साडे पाच वर्षांनंतर…
मुंबई : अल्टा माउंटरोड बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याला मोठा दिलास मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. तब्बल साडे पाच वर्षांनंतर तो तुरूंगाबाहेर येणार आहे. अल्टा माउंट रोडवर स्फोटके ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप आहेत. मुंबई येथील मनसुख हिरेन हत्या […]
अधिक वाचा...मित्राच्या ‘शेवटच्या कॉल’मुळे आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा उलगडा होणार का?
मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा केल्यानंतर, गुन्हे शाखेने आता त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, वाकोडेने फोनवर एका मित्राला सांगितले होते की, त्याला थर्मोडायनामिक्स थिअरीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले होते आणि तो अस्वस्थ होता. त्याने असेही सांगितले की, परीक्षेदरम्यान तो कॉपी करताना पकडला गेला होता. मुंबई गुन्हे […]
अधिक वाचा...रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई…
मुंबईः आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात पोचवणाऱ्या रुग्णवाहिकांपैकी ८२ रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शहरातील ४२७ रुग्णवाहिकांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७९ हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला असून यामुळे मुंबईतील रुग्णवाहिकांची तंदुरुस्ती (फिटनेस), सुरक्षितता आणि आपत्कालीन तयारी पुन्हा एकदा […]
अधिक वाचा...तोतया पीएमओ अधिकारी रोहन पारेखला करायचे होते प्रेयसीला ‘इंप्रेस’…
मुंबईः पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्याचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र तयार करून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पदरित्या फिरणारा उच्चशिक्षित आरोपी रोहन पारेख, याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून अगदी हुबेहुब पीएमओ अधिकाऱ्याचे बनावट कार्ड तयार केले होते. येथील जिओ वर्ल्ड प्लाझात तीन जण घुसले होते. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देण्याचा सोमवारी प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाचे इतर पदर […]
अधिक वाचा...पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट पीएमओ अधिकाऱ्यासह बंदुकधारी अंगरक्षकाला अटक…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क करणारी घटना घडली. सोमवारी ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’च्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचे भासवून, बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहन पारिख (वय २४) याच्यासह दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना मंगळवारी (ता. ८) अटक […]
अधिक वाचा...महिला गोविंदा पथकातील महिलांनी बिस्किटाचे आवरण पेट्रोल पंपाच्या आवारात टाकल्यावरून केला राडा…
विरार: बिस्किटाचे आवरण पेट्रोल पंपाच्या आवारात टाकल्यानंतर चालू झालेल्या वादाचे पर्यवसान, थेट हाणामारीत झाल्याची घटना विरार पश्चिमेतील वटार परिसरात घडली. दहीहंडीनंतर सहलीसाठी नवापूरला गेलेल्या मुंबईतील एका महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांचा, मनवेल पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने तो जखमी झाला. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी […]
अधिक वाचा...मुंबईत व्यापाऱ्यावर बोगस छापा; १ कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांच्या छाप्यात ६ जणांना बेड्या…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पेशल २६’ सिनेमात बोगस प्राप्तिकर अधिकारी दाखवून लूट करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते. तथापि, याच धर्तीवर बनावट प्राप्तीकर अधिकारी बनून अंधेरीत छापा घालण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अंधेरी परिसरातील या व्यावसायिकाच्या कार्यालयात प्राप्तिकर आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे […]
अधिक वाचा...
