
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत.
रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा सात दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा, आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येईल.’
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
दरम्यान, धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. अगरवाल कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी या दोघांना पैशांचे आमिष दाखवले. विशाल अगरवाल याने अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे. त्यानंतर या दोघांनीही अल्पवयीन मुलगा अल्कोहोल टेस्टमध्ये निर्दोष ठरावा, यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी एका दुसऱ्याच रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबकडे दिले.
पुणे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल. या दोघांनाही आता आज (सोमवार) दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे.
ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

