पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…

मुंबई : पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने आज (सोमवार) दोषी ठरलेल्या अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा सुनावली. मागील सुनावणीत कोर्टाने निकाल सुनावत दोषी अभय कुरुंदकर याच्यासह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांना देखील दोषी ठरवले होते. या दोघांना पुरावे नष्ट करणे आणि इतर आरोपांत दोषी ठरवले आहे. […]

अधिक वाचा...

कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…

मुंबई : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची घरातच चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्नी पल्लवी हिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयपीएस ओम प्रकाश त्यांनी २०१५ ते २०१७ पर्यंत डीजीपी पद भूषवले. ते १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी होते. त्यांचा मृतदेह […]

अधिक वाचा...

बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…

बीड: चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडली आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका अल्पवयीन मुलाला चिकन विक्रीच्या वादातून त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान […]

अधिक वाचा...

बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…

बीड : माजलगावच्या भाजप कार्यकर्त्याची आज (बुधवार) भर दुपारी बाजारात हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. माजलगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातही पडसाद उमटायला सुरुवात […]

अधिक वाचा...

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

पुणे : पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय 55) असे हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. कंपनीच्या कामासाठी ई-मेल करत पाटण्यात बोलावून घेत उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कोथरूडमधील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’ झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण साधू शिंदे हे कोथरूड परिसरातील उद्योगपती असून […]

अधिक वाचा...

चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचे पीएसआय अन्नपूर्णा यांनी केले एन्काऊंटर…

बंगळूरू (कर्नाटक): हुबळी जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचे रविवारी (ता. १३) एन्काऊंटर करण्यात आले आहे. आरोपीला अटक करून घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. हे एन्काऊंटर एका महिला अधिकाऱ्याने केले असून, पीएसआय अन्नपूर्णा असे महिला अधिकाऱ्याचे […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…

नागपूर: चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अर्चना राहुले (वय ५०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला जन्मठेप…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोंढवा पोलिस ठाणे या ठिकाणी सन २०१९ मध्ये मृत सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२) हे ओला कंपनीत त्याची स्विफ्ट डिझायर कार नंबर एम. एच. १२ / क्य. जी. / ८९८७ चालवीत होता. त्यावेळी आरोपी तपीश पुखराज चौधरी […]

अधिक वाचा...

सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…

सोलापूर: प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सिन्नूर (ता. अक्कलकोट) येथे घडली आहे. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शेतात आईचा साडीने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीविरोधात अक्कलकोट […]

अधिक वाचा...

दोन्ही मृतदेहांची ओळख पटली; प्रेमप्रकरणातून हत्या; चौघांना अटक…

यवतमाळ: दिग्रस तालुक्यातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात तीन दिवसांपूर्वी महिला व पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान दोन्ही मृतांची ओळख पटली आहे. प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी 4 आरोपी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. वर्षा धनराज गिरे (रा. उमरी बु. ता. मानोरा जि. वाशिम), आकाश […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!