
हृदयद्रावक! करंडे कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू; पाहा नावे…
धाराशिव: धाराशिवच्या येडशीत घरात लावलेल्या पणतीमुळे आग लागून कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अग्निमशन दलाने त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने त्यांना वाचविण्यात अपयश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येडशी गावाच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५), चंद्रकला उत्तम करंडे (७०), गोविंद उत्तम करंडे (वय ४७), ज्योती गोविंद करंडे (वय ४२), गायत्री गोविंद करंडे (वय १६), सिद्धी गोविंद करंडे (वय १५) अशी मृतांची नावे आहेत. एकाला वाचविण्यात यश आल्याचे सांगितले जाते. मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र आगीने रौद्र रूप घेतल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
View this post on Instagram
करंडे कुटुंब किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. त्यामुळे आगीतून बाहेर पडू न शकल्याने कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. करंडे कुटुंबातील सहा जणांचा एकाचवेळी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. आम्ही जेसीबीने भिंती फोडल्या, दरवाजे तोडले, त्यांना बाहेर काढण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केला. अग्निशमन दलाला देखील घटनास्थळी पोहोचायला उशीर लागला. त्यांच्याकडे ऑक्सिजन मास्क नसल्याने त्यांनाही बराच वेळ धुराच्या लोटात आत शिरणे शक्य झाले नाही, असे स्थानिकाने सांगितले.
“आम्ही आजूबाजूच्या परिसरातील बोअर चालू केले. बादल्यांनी पाणी मारले. परंतु आम्हाला यश आले नाही. देवाने त्यांना वाचवायला हवे होते. माणसांचे स्वभाव खूपच भारी होते. अगदी देवासारखी माणसं होती. बाकी सगळं जळालं असतं तरी चाललं असतं पण माणसं वाचायला पाहिजे होती,’ असेही शेजारच्यांनी सांगितले.
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…

