
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर भागात दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय मुलाचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयाने आज (बुधवार) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल याला आज कडेकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. विशाल अगरवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन युवकाला तिथे प्रवेश दिला? विशाल अगरवाल याने विना नंबर प्लेट गाडी का चालवण्यास दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल फरार का झाला? संभाजी नगरमध्ये आढळून आला तेव्हा त्याच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्याचे मोबाईल कुठे आहेत? वरील सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. पण, न्यायलायने तीन दिवसांची कोठडी मान्य केली आहे.
दरम्यान, न्यायालय परिसरात पोहोचताच विशाल अगरवाल याच्यावर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला. विशाल अगरवाल याला घेऊन आलेल्या पोलिस व्हॅनवर शाई फेकण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो बचावला. वंदे मातरम संघटनेने शाईफेक केली. वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशालवर आधीपासून गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

