
महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…
सातारा : कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत म्हणून संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे कराडमधीलच एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता, अशी माहितीही समोर आली आहे.
कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पोलिस ठाण्याला पंधरा दिवसांपूर्वी दोन डॉक्टर महिलांची तक्रार आली होती. त्यांचे अश्लील व्हिडिओ एकाने टाकल्याची तक्रार आली होती. या तक्रारीवरून कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने सायबरच्या मदतीने हे व्हिडिओ कोणी टाकले आहे त्याचा तपास करत असताना विकास शर्मा (वय ५४) या पंजाबच्या व्यक्तीने हे केल्याचे उघड झाले आहे. कराड मधील राजीव शिंदे या डॉक्टरने हा प्रकार करायला सांगितल्याचे त्याने सांगितले.
पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं एक टास्क करावा लागेल. यामध्ये मी सांगतो तसं कर असं सांगत, यावेळी राजेश शिंदे या आरोपीने काही मोबाईल नंबर पाठवत या नंबरचा ग्रुप करण्यास सांगितले. यानंतर महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करत तो पाठवला. विकास शर्मा या ने त्याच्या मोबाईलवरून हे अश्लील व्हिडिओ पुढे टाकले. मी असे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात विकास शर्मा आणि राजेश शिंदे या दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल…
नागपूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने केली हत्या…
डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ…
डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…

