नाशिक! डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज (शुक्रवार) निकाल लागला असून, नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील […]
अधिक वाचा...सीमेपलिकडून शस्त्र तस्करी करणारी टोळी पंजाब पोलिसांकडून उद्ध्वस्त; १३ पिस्तुले, २ ग्रेनेडसह ५ जण अटकेत…
अमृतसरः पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये वडील आणि मुलासह पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक असॉल्ट रायफल, दोन हँड ग्रेनेड आणि १३ विदेशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत. सीमेपलिकडून शस्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करणाऱ्या संशयित नेटवर्कविरोधात केलेल्या कारवाईदरम्यान अमृतसरच्या काउंटर इंटेलिजन्स (सीआय) पथकाने ही अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी आज (ता. […]
अधिक वाचा...पंजाबमधील अंमली पदार्थविरोधी कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या औषध विक्रेत्याला राजस्थानात अटक…
मानसाः पंजाबच्या मानसा जिल्ह्यात दिवसाढवळ्या अंमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या औषध विक्रेता दुकानदाराला, दुसऱ्याच दिवशी, राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. बुधवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोटावर गोळीबार केल्याचा आरोप असलेला औषध विक्रेता अश्वनी कुमार याला राजस्थानातील सालासर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब आणि […]
अधिक वाचा...सामूहिक हत्याकांडाच्या उद्देशाने शिकागोतील हिंदू मंदिरात शिरलेल्या तरुणाची रायफल जॅम; अमेरिकी पोलिसांनी केली अटक…
वॉशिंग्टन: शिकागोमधील इलिनॉय शहरातील अरोरा परिसरात असलेल्या एका हिंदू मंदिरावर हल्ला करून अनेक भाविकांची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी, एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका सामूहिक गोळीबाराच्या कटाच्या तपासाअंती पॅलाटाईन येथील आरोपी अलेक्झांड्रोस पापोराकिस याच्या ताब्यातून श्वेतवर्णीय वर्चस्ववादी विचारसरणी व्यक्त करणारा आणि भारतीय वंशाच्या लोकांवरील हिंसेचा उल्लेख असलेला एक जाहीरनामा जप्त […]
अधिक वाचा...उद्योगपती अनिल अंबानी यांची २,०३२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; परकीय चलनकायद्यांतर्गत कारवाई…
मुंबई: देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत त्यांची ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातच, रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील २,०३२.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कलम ‘३७ अ’ अंतर्गत ही […]
अधिक वाचा...बाहेरच्या खोलीत आत्महत्या केलेल्या पत्नीचे पार्थिव; तर आतल्या खोलीत पती प्रेयसीसोबत; पोलिसांनी घातल्या बेड्या…
गोपेश्वर (उत्तराखंड): जिल्हा मुख्यालयाजवळील ग्वाद गंगलोल गावात कुसमादेवी नावाच्या एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी, पोलिसांनी पती विक्रम याच्याविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री पत्नीच्या निधनामुळे शोक करत असलेल्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी, आरोपीला घरातील दुसऱ्या खोलीत त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले. गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शांततेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी पतीला तुरुंगात […]
अधिक वाचा...निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपीला अटक…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका कंत्राटी कामगाराला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११:०७ वाजता घडल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, ती […]
अधिक वाचा...शासकीय नोकरी असल्याची थाप मारून केले लग्न; परंतु चार महिन्यात पत्नीची आत्महत्या; छत्रपती संभाजीनगर हादरले…
छत्रपती संभाजीनगरः येथील हडको परिसरातील वानखेडेनगरमध्ये संजना नीलेश शेजवळ (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीकडून फसवणूक आणि सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप संजनाच्या माहेरच्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केल्याचा आरोप, पती निलेश शेजवळ याच्यावर करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त […]
अधिक वाचा...जंतर मंतरवर अनधिकृत आंदोलन; सौरभ दास व आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे जबरदस्तीने बेकायदा आंदोलन केल्याबद्दल, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्ली न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अजिंक्य शिंदे याची सुटका करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे कार्यकर्ते सौरभ दास आणि […]
अधिक वाचा...ठाण्यातील हॉटेलवर छापा घालून टीव्ही अभिनेत्रीची सुटका; महिलांना वेश्याव्यवसायात ओढण्याचा कट…
ठाणेः जिल्ह्यात मानवी तस्करी आणि देहविक्रीच्या कथित रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत हिंदी दूरचित्रवाणी मालिका आणि वेब मालिकांमध्ये काम केलेल्या ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. मनोरंजन क्षेत्रात काम मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. […]
अधिक वाचा...
