सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…

सांगली: नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील मांगले येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव […]

अधिक वाचा...

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

सांगलीः वांगी (ता. कडेगाव) येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते (रा. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अपघातग्रस्त वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून […]

अधिक वाचा...

महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल; लातूर आणि सांगलीचा अटकेत…

प्रयागराज/अहमदाबाद : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये गंगा स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करणाऱ्या तीन युट्युबर्सना अटक केली असून, यामधील दोघेजण महाराष्ट्रातील आहेत. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले […]

अधिक वाचा...

आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…

सांगली: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एकाला दगडाने ठेचून मारल्याची घटना सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दत्ता सुतार (वय 35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह करणाऱ्या युवकाचे सासऱ्याने केले अपहरण; सिनेस्टाईल सुटका…

कोल्हापूर : आंतरजातीय विवाह केला म्हणून युवकाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे. विशाल अडसूळ (वय २६) असे या अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनीच जावयाला सांगलीमधल्या घरात अर्ध नग्न अवस्थेमध्ये […]

अधिक वाचा...

सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…

सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप २५ वार केले आहेत. दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विपूल अमृतपुरी गोस्वामी […]

अधिक वाचा...

सांगली जिल्ह्यात टोळक्याने केली मध्यरात्रीच्या सुमारास पहिलवानाची निर्घृण हत्या…

सांगली : सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कार्वे गावात एका पहिलवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी टोळक्याने गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पहिलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. राहुल गणपती जाधव (वय ३५) असे हत्या झालेल्या पहिलवानाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव…

सांगली : दोन भावांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला आहे. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी सचिन […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावरील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला […]

अधिक वाचा...

सांगलीत सिनेस्टाईल पद्धतीने नंग्या तलवारी नाचवल्या; युवकाची हत्या…

सांगली: तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला आहे. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!