
पुणे कार प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन जणांना अटक…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात वेगाने चालवत असलेल्या धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागड्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. या घटेत अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत असून, पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त घेऊन मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आशपाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी) आणि अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाष नगर, नवी खडकी, येरवडा)असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे याच्या माध्यमातून श्रीहरी हरनोळ, अतुल कांबळे यांच्यासोबत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली, रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली, आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप अटक करण्यात आलेल्या या दोघांवर आहे. त्या दोघांना दहा तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
कल्याणीनगरमध्ये रविवार, १९ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोन आयटी अभियंत्या तरुण-तरुणीचा दुर्देवी भीषण मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अल्पवयीन मुख्य आरोपी मुलावर भादवि ३०४, ३०४ (अ), २७९, ३३८, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, १९९/१७७ अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामधील पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर भादवि २०१, १२० ब, २१३, २१४, ४६७ या नुसार कलमवाढ करण्यात आली. तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडील विशाल अगरवाल, ससूनचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे तसेच आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली होती. आरोपी अल्पवयीन मुलाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्याच्या रक्ताऐवजी आई शिवानी हिचे नमुने घेण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
पोलिसांकडून तपास सुरू असताना आरोपी मकानदार आणि गायकवाड या दोघांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचला असल्याचे समजले. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत मकानदार आणि गायकवाड या दोघांची नावे समोर आली होती. तसेच ससूनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हे दोघे दिसून आलेले होते. मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचा वडील विशाल अगरवाल याने मकानदार आणि गायकवाड यांची मदत पुरावा नष्ट करण्यासाठी घेतली. त्यांच्या मदतीने ससून रुग्णालयामधील डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला. त्याच्या मध्यस्थीने डॉ. श्रीहरी हाळनोर, कर्मचारी अतुल घटकांबळे या दोघांशी आर्थिक देवाणघेवाण केली. त्यांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल करण्यात आला. त्याऐवजी त्याची आई शिवानी अगरवाल हिचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मकानदार आणि गायकवाड यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांचा शोध सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण तसेच व खबऱ्यामार्फत शोध सुरू होता. या दोघांना अखेरीस मुबंईतून अटक करण्यात आली.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…
पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने केला खुलासा…
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…
पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…
पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…
ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…
पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…
पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….
पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

