पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…

पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार चालवणारा अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे त्याच्या अध्यक्षपदी आहेत. पण डॉ. पल्लवी सापळेयांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने वाद निर्माण झाला आहे. आता त्यात आणखी भर पडली असून चौकशीच्या नावाखाली बिर्याणीवर ताव मारणारी समिती अशी नवी ओळख मिळाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

धनिक पुत्राला वाचवण्याच्या प्रयत्नात ससूनची बदनामी झाली आहे. ससूनमधील सावळ्या कारभाराचा खुलासा करण्यासाठी चौकशी करण्यासाठी आता एसआयटी समिती गठीत केली. मात्र, पुण्यात आलेली ही समिती पहिल्याच दिवशी चर्चेत आली ती त्यांच्या बिर्याणीच्या मेजवानीमुळे. चौकशीच्या नावाखाली पुण्यात येऊन बिर्याणीवर ताव मारणारी समिती बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

रुग्णालय प्रशासनाने चौकशीसाठी आलेल्या समितीच्या खातीरदारीमध्ये कोणतीची कमी ठेवली नाही. समितीतील सदस्यांसाठी पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आली. बिर्याणीवर आक्षेप नाही मात्र अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या दालनात मेजवानी सुरू असताना चौकशीसाठी बोलवलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणास मनाई केली. समितीचे सदस्य बिर्याणीवर ताव मारत असताना बाहेर कर्मचारी मात्र उपाशीपोटी ताटकळत उभे असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी (ता. २८) दुपारी ही समिती तपासासाठी पुण्यात पोहचली. धनिकपुत्राने दोन जणांना चिरडल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप आहे. त्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रतापाने तर कहर केला. त्यात चौकशी समितीकडून पारदर्शक कारभाराची सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. मात्र पहिल्याच दिवशी समितीच्य बिर्याणी पार्टीची चर्चा चांगलीच रंगली. अर्थात कोणी काय, कधी खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्यामुळे कोणीतरी ताटकळत, उपाशीपोटी उभे आहे, याचे भान समितीने ठेवणे अपेक्षीत आहे.

एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…

पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…

पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!