सामूहिक हत्याकांडाच्या उद्देशाने शिकागोतील हिंदू मंदिरात शिरलेल्या तरुणाची रायफल जॅम; अमेरिकी पोलिसांनी केली अटक…
वॉशिंग्टन: शिकागोमधील इलिनॉय शहरातील अरोरा परिसरात असलेल्या एका हिंदू मंदिरावर हल्ला करून अनेक भाविकांची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी, एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका सामूहिक गोळीबाराच्या कटाच्या तपासाअंती पॅलाटाईन येथील आरोपी अलेक्झांड्रोस पापोराकिस याच्या ताब्यातून श्वेतवर्णीय वर्चस्ववादी विचारसरणी व्यक्त करणारा आणि भारतीय वंशाच्या लोकांवरील हिंसेचा उल्लेख असलेला एक जाहीरनामा जप्त […]
अधिक वाचा...ओमानजवळ टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय खलाशी बेपत्ता; ९ जणांची सुटका…
नवी दिल्लीः ओमानमधील सोहार बंदरामध्ये निकाराग्वा देशाचा ध्वज असलेल्या ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’, या टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, दोन भारतीय कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. टँकरवरील अन्य ९ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज येथे सांगितले. ‘एक्स’ या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, सोनोवाल यांनी म्हटले आहे, की […]
अधिक वाचा...बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात ग्वादरमध्ये पाकिस्तानी तटरक्षक दलाचे १३ जवान ठार…
इस्लामाबाद: बलुचिस्तानच्या ग्वादर जिल्ह्यातील जिवानी येथे बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) एका तुकडीने पाकिस्तानच्या तटरक्षक दलाच्या दोन बोटींवर जोरदार हल्ला केला. त्यात तटरक्षक दलाचे १३ सैनिक ठार झाल्याचे बीएलएच्या सूत्रांनी सांगितले. ही कारवाई त्यांची सागरी शाखा असलेल्या हम्माल मेरिटाइम डिफेन्स फोर्सने केल्याचा दावा या गटाने केला आहे. बीएलएने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. एका निवेदनात त्यांनी […]
अधिक वाचा...हूती बंडखोरांचा सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हल्ला; तीन जण ठार, तर ३६ जखमी…
रियाधः सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनानुसार, सौदी अरेबियातील दोन विमानतळांवर हुतींनी केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन नागरिक ठार आणि ३६ जण जखमी झाले आहेत. रियाधमधील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यात मोरोक्को आणि अल्जेरिया येथील दोन महिलांचा मृत्यूमुखी पडल्या […]
अधिक वाचा...सहवैमानिकाच्या हल्ल्यामुळे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कवटीला झालेल्या फ्रॅक्चरवर सौदी अरेबियात शस्त्रक्रिया…
अबू धाबीः दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले शूर वैमानिक कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. ओमानचा सहवैमानिक हम्मामी याने कॅप्टन स्मित यांच्या डोक्यावर प्रहार केला होता, ज्यामुळे त्यांच्या कवटीला तडा गेला होता. हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांच्या हाडाला ‘डिप्रेस्ड फ्रॅक्चर’ झाले होते आणि सौदी अरेबियामध्ये त्याच्यावर तातडीचे उपचार […]
अधिक वाचा...गाझावरील इस्रायली हल्ल्याचा बदला घेण्यासाठी फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने रचला विमान अपघाताचा कट…
तेल अवीव: फ्लायदुबई कंपनीत नोकरी मिळण्यापूर्वीच हमाम अल हम्मामी याने, इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर विमान धडकवण्याची योजना आखली होती. संयुक्त अरब अमिरातीचे सुरक्षा अधिकारी हम्मामी याची चौकशी करत आहे. या चौकशीशी संबंधित असलेल्या दोन इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देत ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने हे वृत्त दिले आहे. इस्रायलची ‘शिन बेट’ या सुरक्षा संस्थेने गेल्या आठवड्यात विमानावर […]
अधिक वाचा...फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने जुलैमध्येच आखली होती इस्राएलवर हल्ल्याची योजना…
अबू धाबी: तेल अवीवला जाणारे विमान पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर, विमान धडकवण्याची योजना आखली होती. अटकेत असलेल्या ओमानचा दहशतवादी सहवैमानिक हमाम अल-हम्मामी याने संयुक्त अरब अमिरातीच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार यांची हत्या करून, संशय निर्माण होऊ न देता विमान उतरविण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळवायच्या आणि फ्लायदुबई […]
अधिक वाचा...फ्लायदुबई विमानातील सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्चर यांच्यावर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने केला होता हल्ला…
अबू धाबीः दुबई-तेल अवीव फ्लायदुबई विमानाचे सह-वैमानिक हमाम अल हम्मामी या सहवैमानिकाने भारतीय वीर वैमानिक कॅप्टन स्मित मच्चर यांच्यावर चाकूने नव्हे, तर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने हल्ला केला होता, असे संयुक्त अरब अमिरातीच्या अभियोक्त्यांनी शनिवारी पुष्टी केली. अल हम्मामीने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांनुसार, प्रत्येक व्यावसायिक विमानात अपघात बचाव […]
अधिक वाचा...अमेरिकेतील ओहायोमध्ये स्वामीनारायण मंदिरावर समाजकंटकांचा विटा फेकून हल्ला; सुदैवाने जीवितहानी नाही…
वॉशिंग्टनः अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ग्रेटर क्लीव्हलँड परिसरातील श्री स्वामीनारायण हिंदू मंदिरावर समाजकंटकांनी विटांनी हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी मंदिरात पुजारी आणि अनेक भाविक उपस्थित होते. ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (कोहना) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ओहायो राज्यातील रिचमंड हाइट्स येथील श्री स्वामीनारायण हिंदू मंदिर वडतालधामला लक्ष्य करण्यात आले होते. हल्लेखोरांनी मंदिरावर […]
अधिक वाचा...होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये आणखी एका व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्राचा हल्ला; सुदैवाने पाच भारतीय प्रवासी बचावले…
नवी दिल्ली: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवरील हल्ले अव्याहतपणे सुरू आहेत. कुवैती ध्वज असलेल्या एका जहाजावर असाच आणखी एक हल्ला झाला आहे. या जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये पाच भारतीय नागरिकांचा समावेश होता. मात्र, हे पाचही भारतीय कर्मचारी सुखरूप बचावले आहेत, असे ओमानमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय दूतावासाने सांगितले की, कुवैती ध्वज असलेल्या एका क्रूड तेलाच्या टँकरवर पाच […]
अधिक वाचा...
