हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंशी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत भरती झाली होती. स्मिता सुर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरले होते. मात्र, सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही. गोंदिया येथे झालेल्या शिवशाहीच्या बस अपघातात महिला पोलिस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोंदियाच्या कोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा-खजरी गावाजवळ शुक्रवारी (ता. २९) […]
अधिक वाचा...गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात! ११ जणांचा जागीच मृत्यू…
गोंदिया : शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ अपघाताची घटना घडली आहे. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…
छत्रपती संभाजीनगर: फायमोसिस विथ पिनलाइन टॉर्शन (लघवीच्या जागेवरील खाज) या आजाराची सुमारे २५ मिनिटांत शस्त्रक्रिया होईल, असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. […]
अधिक वाचा...पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासानंतर युवतीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सृष्टी ही गोरखपूरमधली (उत्तर प्रदेश) पहिली वैमानिक युवती होती, त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेला […]
अधिक वाचा...राज्यात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेट सक्ती, अन्यथा…
मुंबई: विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. सृष्टी ही विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…
जळगाव : तांबोळे (ता. चाळीसगाव) शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून शेतातील मजुरांनी गावाकडे धाव घेतली. यावेळी घाबरलेल्या युवतीने विहिरीत उडी मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…
बीडः पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना खामकरवाडी गावात (जि. बीड) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावामध्ये शाळेचं गेट अंगावर पडून सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. केर्लेमधील कुमार हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे. स्वरूप माने असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहावीमध्ये शिकत होता. शाळेमध्ये लघूशंकेसाठी जात […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला…
नागपूर : नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत कर्मचाऱ्यांना गाडीतून सुखरुप बाहेर काढले. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बुथ क्रमांक 268 च्या जवळ बुधवारी (ता. […]
अधिक वाचा...