
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांचे नावे आहेत. संबंधित घटना घडल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
धक्कादायक म्हणजे मोटारीला नंबर नसलेल्या आणि तीन कोटी रुपये किंमत असलेल्या पोर्शे सारख्या भरधाव गाडीने आणि पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांच्या सतरा वर्षांच्या मुलाने या दोघांना चिरडले आहे. अपघात घडला त्यावेळी मोटार २००च्या स्पीडने होती आणि अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. अपघात झाल्यावर अगरवाल याच्या मुलाला अवघ्या 15 तासांत जामीन मंजूर करण्यात आला. त्याला मिळालेल्या जामीनानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आणि या प्रकरणावर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धनिक पुत्रावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील घटनाक्रम पुढीलप्रमाणे….
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

– रविवारी (ता. 18 मे) पहाटे अडीच वाजता कल्याणी नगरमध्ये अपघात घडला.
– अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या पोर्शे अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडले.
– दोघेही पुण्यातील जॉन्सन कंपनीत कामाला होते.
– अपघात झाल्यानंतर तिथे जमलेल्या जमावाने मुलाला चोप दिला आणि पोलिसांकडे सोपवले.
– अपघातावेळी नागरिकांनी मोबाईलमधून चित्रिकरण केले त्यावेळी अल्पवयीन मुलगा वाहन चालवत असल्याचे उघड झाले.
– पोलिसांकडे सोपवल्यावर तो पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे समोर आले.
– सुरवातीला अल्पवयीन मुलगा वाहन चालवत नव्हता, असे दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.
– अपघाताच व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अल्पवयीन मुलगाच वाहन चालवत असल्याचे उघड झाले.
– विशाल अग्रवालचा मुलगा असल्याचे यंत्रणा कामाला लागली.
– पोर्शे सारख्या गाडीला नंबर प्लेट नसताना पुण्याच्या रस्त्यांवर ही गाडी कशी धावत होती, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
– तपासादरम्यान पोर्शे मोटारीची नोंदच नसल्याचे समोर आले.
– काही प्रमुख अटी व शर्तींसह न्यायालयाने 15 तासांतच अल्पवयीन आरोपीचा जामीन मंजूर केला.
– अल्पवयीन आरोपी हा दारु पिल्याचा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच जामीन मंजूर केला.
– अल्पवयीन आरोपीचा जामीन मिळाल्याचे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
– यानंतर या प्रकरणाचे धक्कादायक सीसीटीव्ही समोर आले. व्हिडिओ व्हायरल झाले.
– मी दारु पितो आणि पप्पांनीच मला गाडी चालवायला दिली होती, असे अल्पवयीन आरोपीने कबुल केले.
– रविंद्र धंगेकर यांच्यासह कार्यकत्यांनी पोलिस चौकीबाहेर आंदोलन केले
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
– अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. पण, आमदार सुनील टिंगरे यांनी आरोप फेटाळले.
– अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवालवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले.
– अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक केली आहे.
– पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
– खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी योग्य कारवाईची मागणी केली आहे. अपघातप्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त नेमकी कुणाला मदत करतायत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
– राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
– दोन्ही पबचे लायसन्स सस्पेंड करायचे आदेश काढण्यात आले आहेत.
– पुण्यातील बार आणि पबचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

