पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) मदतीने प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी ‘एआय’मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान पोर्शे कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. ‘प्रादेशिक परिवहन विभागा’च्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, अपघातग्रस्त कार ताशी १६० किलोमीटर वेगाने धावत होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी पाहणी करून ‘सीसीटीव्ही’ फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कार एका ठिकाणी सुसाट जात असल्याचे दिसून येते. संबंधित रस्त्यावर ‘सीसीटीव्हीं’चे जाळे असूनही अपघाताचा प्रत्यक्ष व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

दुचाकीला धडक दिल्यानंतर आलिशान पोर्शे कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अन्य कारवर आदळली. त्या वेळी कारचा वेग किती असेल याचा अभ्यास केंद्रीय संस्थांच्या मदतीने केला जाणार आहे. आलिशान कारच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यात अपघाताच्या ठिकाणची चित्रित झालेली दृश्ये मिळविण्यात येत आहेत. त्यासाठी ‘पोर्शे’च्या तंत्रज्ञांसह आरटीओ अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २७ मे) पुन्हा एकदा तपासणी केली. या सर्व माहितीच्या आधारे ‘एआय’द्वारे अपघाताचे दृश्य बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पोलिसांकडून या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यामध्ये अल्पवयीन कारचालक घरातून निघाल्यापासून अपघाताच्या ठिकाणी पोहोचेपर्यंतच्या सर्व घटनांची साखळी जोडण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. गुन्ह्यातील सुरुवातीच्या काही घडामोडींमुळे पोलिसांसह सर्वच यंत्रणांभोवती संशयाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर, पोलिसांनी गांभीर्य दाखवून कारवाई केली. त्यानंतर, आता गुन्ह्याचा तपास पूर्ण करून लवकरात लवकर सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा मानस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अपघात प्रकरणी सबळ पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी अपघाताच्या घटनेचे ‘डिजिटल रिक्रिएशन’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये तंत्रज्ञान आणि वाहतूक क्षेत्रातील संस्थांची मदत घेतली जाणार आहे, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…

पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!