अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!
पुणेः वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची शासनाने नुकतीच अपर पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नती देऊन सीआयडी क्राईम, पुणे येथे नियुक्ती केली आहे. यामुळे पोलिस दलासह विविध क्षेत्रांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अशोक इंदलकर 1992-93 बॅचचे अधिकारी आहेत. पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले होते. मुंबई पुणे, कोल्हापूर नागपूर, अमरावती या ठिकाणी त्यांनी काम पाहिले आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पोलिस ठाणे या ठिकाणी काही दिवस काम पाहिल्यानंतर त्यांची स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. स्वारगेट पोलिस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांनी धडाकेबाज कारवाया करत विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिस खात्यात अत्यंत प्रभावी व धाडशी कामगीरी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय, वृत्तपत्र, मासिके यामधून त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. पुरस्कार प्राप्त कारंबऱ्या लिहणारे साहित्यीक, लेखक अशी त्यांची ओळख आहे. शिवाय, विविध वृत्तपत्रे, वेबसाईट, नियतकालिकमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सायबर क्राईम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांची विविध विषयांवरील चार पुस्तके प्रकाशित झाली असून, एका पु्स्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कॉन्टीनेंटल प्रकाशीत ‘युआर अंडर अॅरेस्ट या पुस्तकास प्रेरणा फाऊन्डेशनचा पुरस्कार मिळाला आहे. विविध गुन्हे त्यांनी उघड केले असून त्यांना पोलिस खात्याची १२५ हून अधिक बक्षीसे ५० हून अधिक प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. पुढील काही दिवसांमध्ये त्यांची इंग्रजी कांदबरी प्रकाशित होत आहे.
पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस शोभराज आणि पोलिस अधिकारी मधुकर झेंडे: अशोक इंदलकर
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
इतिहास पोलीस दल निर्मितीचा… (अशोक इंदलकर)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!