पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी धनाढ्य अगरवाल कुटुंबाकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे उघड झाले आहे. अगरवाल कुटुंबातील विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रकार परिषदेत अगरवाल कुटुंबीयांनी त्यांच्या चालकाला कसे धमकावले, याबाबतचा सविस्तर तपशील सांगितला. चालक आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर आरोपींनी गंगाराम पुजारी याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले. ‘तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा’, असा दबाव अगरवाल बाप-बेट्यांनी चालकावर आणला. ‘तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे आम्ही तुला गिफ्ट देऊ’, असे सांगून अगरवाल यांनी गंगाराम पुजारीला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अगरवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. ‘आम्ही तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली’, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

दरम्यान, विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी चालक गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगाराम पुजारीची पत्नी नातेवाईकांना घेऊन अगरवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अगरवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अगरवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अगरवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता. पण पोलिसांनी परवा त्याचा जबाब नोंदवून घेतला. काल त्याची प्राथमिक चौकशी करुन आम्ही सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर कलम 342, कलम 365 आणि कलम 368 अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अगरवाल याला अटक केली आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

surendra-agarwal

पुणे अपघात प्रकरणाचा तपास शुक्रवारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रायव्हरसह अगरवाल यांच्या घरी जाऊन पंचनामा केला. ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबण्यात आले होते, त्यावेळी ड्रायव्हरने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली.

मी गाडी चालवत नव्हतो…
अपघात झाला त्यावेळी पोर्शे कार माझा मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता, असा दावा विशाल अगरवाल यांनी न्यायालयात केला होता. मात्र, अपघाताच्या वेळी गाडी विशाल अगरवाल यांचा मुलगाच चालवत होता, अशी कबुली ड्रायव्हरने दिली. माझी कोणतीही चूक नाही. अगरवाल यांनी आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला दबावात घाबरुन जाऊन जबाब दिला. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. मी घाबरलो होतो, असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले. अगरवाल कुटुंबीयांनी आपल्याला जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले, याचा ड्रायव्हर गंगाराम पुजारीला मोठा मानसिक धक्का बसल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

ashwini-kosta
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!