‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना’ पुस्तक नागरिकांसाठी उपयुक्त : डॉ. सदानंद दाते
पुणे: सहाय्यक पोलिस आयुक्त (नि.) अशोक इंदलकर यांनी आपल्या ३३ वर्षांच्या दीर्घ पोलिस सेवेतील अनुभवाच्या आधारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक लिहिले असून, या पुस्तकामध्ये नागरिकांना उपयुक्त अशी माहिती आहे. नागरिकांना या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल, असे मत राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. सदानंद दाते यांनी व्यक्त केले आहे. ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाचे […]
अधिक वाचा...विटा आणि दगडांनी ठेचून तरुणाची हत्या; उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये शेतात उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह…
कौशांबीः मंझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महम्मदपूर गावाजवळ शेतात बेवारस पडलेल्या एका गाडीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. विटा आणि दगडांनी मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. मृतदेहावर जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत. गाडीचा नोंदणी क्रमांक आणि मृतदेहाजवळ सापडलेल्या काही कागदपत्रांच्या आधारे, मृतदेहाची ओळख प्रयागराजच्या फाफामऊ येथील रहिवासी रवी यादव, अशी पटली आहे. घटनास्थळावरून […]
अधिक वाचा...पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…
छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका युवकाकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते. साध्या चप्पलवर पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्याने आपल्या कर्तृत्वाने दिले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पोलीस होण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं, पण सरावासाठी साधे शूज घेणंही त्याला परवडणारं […]
अधिक वाचा...Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायण गावमधील. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढे उच्च शिक्षण घेत पोलिस दलात दाखल झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी विविध पदव्या मिळवल्या असून, पुढेही त्यांचे शिक्षण सुरू आहे. पोलिस दलातील धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणतही त्यांनी आरोग्य आणि अनेक छंद जोपसले आहेत. पोलिस दलात आल्याचे समाधान […]
अधिक वाचा...पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…
पुणे: पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तीस दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस […]
अधिक वाचा...राज्यात पोलिस भरतीला सुरुवात; अर्जदारांची संख्या मोठी…
मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला सुरूवात झाली आहे. भरतीच्या जागा कमी असल्या तरी अर्जदारांची संख्या मोठी आहे. राज्यात विविध भागांमध्ये भरतीची प्रक्रिया चोख नियोजनात पार पडणार आहे. हिंगोली पोलिस दलामध्ये 64 पदांसाठी पोलिस भरती होणार असून आज या पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. हिंगोली शहरातल्या संत नामदेव कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया […]
अधिक वाचा...पुणे! स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले असून एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. १४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५) मधील एम. एच.-१२- यू / एल -५२०३ […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…
पुणे: पुणे शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणे पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता, पोलिस दलात किमान २० ते २१ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ १० हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. […]
अधिक वाचा...Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…
धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहन भीमा जाधव (वय ५५) असे मृत पावलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि […]
अधिक वाचा...‘पुणे ग्रँड टूर’! पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. सह-पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सायकल स्पर्धा शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असल्याने वाहतूक कोंडी […]
अधिक वाचा...
