दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…

मुंबई: दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे. संजय राव उर्फ दीपक असे या माओवाद्याचे नाव आहे. संजय याची पत्नीही माओवादी असून तिलाही बंगळूरूमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय हा उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेकपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो गेल्या तीस वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. […]

अधिक वाचा...

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल…

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कमलेश सुतार आणि अनिल […]

अधिक वाचा...

गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक…

मुंबई : गणेश उत्सव 2023 बाबत राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (ता. 5 ) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर काय करता येईल आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत बैठकीत चर्चा झाली. विविध ठिकाणी सुविधा केंद्र तयार […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्यात सोमवारपासून जमावबंदीचे आदेश लागू…

जालना: जालना जिल्ह्यात सोमवारी (ता. ४) सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले आहेत. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर परिस्थिती बिघडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत. जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, […]

अधिक वाचा...

‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर आंदोलन…

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार आणि प्रशासन यांना विचारणार जाब मुंबई : राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांना भेटून निवेदन देत […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. जवान वैभव भोईटे अनंतात विलीन झाले असून, दीड वर्षाच्या लेकीने त्यांना अग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. लडाखमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये एक […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

मुंबईः महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर काही जण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेने याची गंभीर दखल घेतली आहे. […]

अधिक वाचा...

लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

मुंबई: कारागृहातील उद्योगांमध्ये काम करत असलेल्या कैद्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील सात हजारांपेक्षा अधिक कैद्यांना लाभ होणार असल्याचे कारागृह विभागाने सांगितले. कारागृहातील कैद्यांना दिवसाला पाच ते दहा रुपयांची वाढ शनिवारपासून लागू झाली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये सरासरी ७ हजार कैदी काम करत असतात. यामध्ये पुरुष कैदी ६३०० आणि […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर; पाहा नावे…

३३ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना ‘पोलिस पदक’ जाहीर नवी दिल्ली: पोलिस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ आज (सोमवार) जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!