
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. राहुल गांधी यांनीही व्हीडिओ शेअर करुन पुणे अपघातप्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
कल्याणीनगर परिसरात ब्रह्मा कॉर्पचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.’
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
दरम्यान, या दुर्घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा याविषयी भाष्य करत कठोर कारवाईची हमी दिली आहे.
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

