ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… ‘ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे…
दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल…
माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट २०२३ म्हणजेच राखी पोर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी निधन झाले. ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संशयास्पद मृत्यूमुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. अहवाल कधी येईल? यासंबंधी ससूनमध्ये जाऊन अनेकदा माहिती घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण, माहिती तर मिळतच नव्हती…
ससून रुग्णालयात अनेकदा विचारणा केल्यानंतर सात महिन्यानंतर अहवाल सुपा पोलिस स्टेशनला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुपा पोलिस स्टेशनमधून आम्हाला अद्याप अहवाल हाती देण्यात आलेला नाही. पण, ब्लड इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आमच्या हाती अहवाल का देत नाहीत? याबाबत तर संशय आहेच. पण, ससून रुग्णालयातील कार्यभार पाहता आणि ब्लड सँपल बदलल्याचे समजल्यानंतर आम्हाला सुद्धा अहवालामध्ये संशय वाटत आहे. याबाबत पुर्नतपासणी करण्याची मागणी करणारे पत्र पोलिस स्टेशनला देणार आहोत. पाहूयात… सर्वसामान्य नागरिकांना मृत्यूनंतर तरी न्याय मिळतो का. धनिकांच्या बाबतीत काहीही होऊ शकते. पण, सर्वसामान्यांचा कोणी वाली नाही, हे आता सिद्ध होत आहे.
भाची दिशा भोईटे हिच्या बाबत प्रथम घटनाक्रम….
घटनाक्रम…
दिशा हिला २४ ऑगस्ट २०२३ रोजी ताप आला.
१) आनंद हॉस्पिटल, पारनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर):
२५ ते २८ ऑगस्ट दरम्यान पारनेर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल.
२८ ऑगस्ट रोजी आनंद हॉस्पिटल, पारनेर (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथून डिस्चार्ज.
२८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दिशाला प्रचंड त्रास होऊ लागला.
२) ओंकार रुग्णालय (सुपा) (जि. अहमदनगर):
२९ ऑगस्ट रोजी सकाळी ओंकार रुग्णालय (सुपा) येथील रुग्णालयात दाखल.
– ओंकार रुग्णालयाने रक्त तपासणी केली
– रक्ताचा अहवाल हाती आल्यानंतर डेंगू झाल्याचे निदान.
– ओंकार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
– दिशा हिची प्रकृती ढासळत चालली होती.
– ओंकार रुग्णालयातील डॉक्टरांची अरेरावीची भाषा
– रुग्णालयाकडे रुग्णवाहिकची व्यवस्था नव्हती.
– नातेवाईकांना तुमची रुग्णवाहिका नको म्हणून सांगण्यात आले
– हॉस्पिटलची रुग्णवाहिका फोन केल्यानंतर तब्बल दीड तासानंतर आली.
– एरवी अर्धा तासात रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचते.
– रुग्णवाहिकेत रुग्णासोबत एक डॉक्टर आणि नातेवाईक
– रुग्णवाहिका पुणे शहराच्या दिशेने निघाली.
– दिशा शिरूर जवळ असताना पोट दुखत असल्याचे सांगू लागली.
– रुग्णवाहिकेमधील डॉक्टरने एक इंजेक्शन दिले.
– डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर दिशा दहा मिनिटानंतर बोलायची बंद झाली ती कायमचीच.
– रुग्णवाहिका केईएम रुग्णालयात संध्याकाळी सहाच्या सुमारास दाखल झाली.
– केईएमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
– दिशाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी.
– २९ ऑगस्ट रोजी रात्री शवविच्छेदन करण्यात आले.
– मृत्यूबाबत संशय व्यक्त करत व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
– ३० ऑगस्ट रोजी दिशावर अंत्यसंस्कार.
दरम्यान, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधित कुटुंब दुःखात बुडते. कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला असतो. संबंधित कुटुंबाला मृत्यूचे कारण समजत नाही. दुसरीकडे सरकारी काम. कोणी माहिती देत नाही. सर्वसामान्य नागरिकांना कोणाकडे जावे कळत नाही. यामुळे दिवस पुढे-पुढे जात राहतात. मग, आपली व्यक्ती गेली. आता मृत्यूचे कारण समजून काय होणार? हा विचार पुढे येऊ लागतो. पुढे संवेदनशील होऊ लागतो. पोलिस अथवा प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही तर मग विचारायलाच नको. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतरही न्याय मिळेल की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. यामुळे संबंधित कुटुंबियांनी सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. रोज मरे त्याला कोण रडे, अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे. पण, आपल्या व्यक्तीसाठी आपल्यालाच पुढे यावे लागले.
ससून रुग्णालयात पैशाच्या जोरावर अहवाल बदलले जात असतील तर आजपर्यंत किती जणांच्या बाबतीत असा प्रकार घडला असेल. किती जण मृत्यूनंतरही न्यायाच्या प्रतिक्षेत असतील? प्रत्येक ठिकाणी पैसा बोलत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी मुग गिळून गप्प राहायचे का? खरी प्रकरण पुढे आलीच पाहिजेत आणि दोशींना शिक्षा झालीच पाहिजे.
दिशा भोईटे हिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर पत्रकार म्हणून मी सातत्याने लिहित आहे. पण, अद्याप दिशा भोईटे हिच्या मृत्यूचा अहवाल हाती आलेला नाही. आणि सुपा पोलिस स्टेशनमधून जे सांगण्यात आले, त्यावर आम्हाला संशय आहे. यामुळे पुन्हा एकदा पुर्नचौकशीची मागणी करत आहोत.
संबंधितांसाठी टीपः
दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही.
– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
30/05/2024
हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
दिशा भोईटे मृत्यू आणि शवविच्छेदन अहवालाबाबत सविस्तर माहिती…
दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही… https://t.co/MlDASvXSwo @PuneCityPolice @DhangekarINC @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @supriya_sule @SantoshDhaybar @mrhasanmushrif @DGPMaharashtra @NCP_NMCspeaks pic.twitter.com/XfqUvkE1RC
— policekaka News (@policekaka) May 30, 2024
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…