
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणेः पुणे शहारतील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा मुलगा विशाल अगरवाल हा देखील पोलिस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे. सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता आजोबा अशा तिघांनाही अटक झाली आहे. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवालची गुरुवारी (ता. 23) चौकशी करण्यात आली. या चौकशीत नातवाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती. घटनेच्या दिवसापासून ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याचा आरोप सुरेंद्र अगरवालवर आहे. सुरेंद्र अगरवाल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते, असेही समोर आले होते. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर आता त्याच्या आजोबांनाही अटक करण्यात आली आहे.
सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी चालकाचे अपहरण करून डांबून ठेवले. बंगला देतो असे अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. त्या चालकाचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते. त्यानंतर चालकाने कसातरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पत्नीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
दरम्यान, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी विशाल अगरवाल याचा आणखी तपास करायचा असल्यामुळे पोलिस कोठडीची मागणी केली होती, पण 420 सारख्या गुन्ह्याच्या आरोपात पोलिस कोठडीची गरज नाही, असे म्हणत न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळून लावली.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कल्याणी नगर अपघाताचा तपास केला जाणार आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने तसंच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे येरवडा अपघाताचा तपास करणार आहेत.
येरवडा पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. पोलिस निरिक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबन झालेल्या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपासात दिरंगाई ठेवल्याचा तसंच अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

