राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबई : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, तसा जीआर राज्याच्या गृहखात्याने काढला आहे. त्यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. त्याचसोबत आर. बी. डहाळे यांची राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीतून राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर […]
अधिक वाचा...पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून वाहतूक पोलिस अकॅडमीची सुरुवात आणि पहिल्या बॅच चे 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सर्टिफिकेट वितरण सोहळा पार पडला. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कल्पनेतुन पुणे वाहतूक पोलिस अॅकेडमी ही संकल्पना साकारण्यात आली आहे. सह. पोलिस आयुक्त, पुणे शहर, […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांच्या ‘तरंग’ कार्यक्रमाला लागली नाराजीची किनार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन, इ. कर्तव्यावर तैनात असल्याने पोलिस अधिकारी/अंमलदार समवेत त्यांचे कुटुंबीय देखील ताणतणावामध्ये असतात. यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता यावेत व उत्साहाचे वातावरण मिळावे यासाठी पोलिस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतून […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास…
पुणे : पुणे शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत त्यांनी झाडाला गळफास घेतला आहे. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. गुंजाळ हे खडकी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते, मात्र, गेल्या तीन […]
अधिक वाचा...बीट मार्शलकडून पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…
नागपूर: नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिस अधिकाऱ्याला काही पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली होती. संबंधित व्यक्ती पोलिस अधिकारी असल्याचे समजल्यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनीच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणेः पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील विविध शाखेतील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे. पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या बाणेर पोलिस ठाणे, नांदेड सिटी पोलिस ठाण्याला सुद्धा नवीन पोलिस निरीक्षक मिळाला आहे. गुन्हे शाखा, वाहतूक आणि नियंत्रण कक्षातील निरीक्षकांच्या बदल्या […]
अधिक वाचा...बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवनीत काँवत यांनी आज (मंगळवार) एक महत्त्वाचा आदेश जारी […]
अधिक वाचा...पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…
मुंबई : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलिस भरती करण्याच्या विचारात आहेत. गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार 10 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलिस […]
अधिक वाचा...पोलिसांना धमकी देणाऱ्या श्रीमंताच्या पोराची काही वेळातच उतरवली मुजोरी…
छत्रपती संभाजीनगर : ‘तुने पहेचाना नही क्या, मैं कोण हूँ, दो घंटे में तेरी वर्दी उतारता हूँ,’ असे म्हणत वाहतूक पोलिसांना एकाने धमकी दिली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चालकाचा समाचार घेतला होता. पोलिसांनी संबंधित चालकाला मोटारीसह ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. […]
अधिक वाचा...पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…
गोंदिया: कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे. गोंदियाच्या नवेगावबांध पोलिस स्टेशन हद्दीतील धाबेपवनी AOP मध्ये ही घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कर्माचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षल गतीविधीवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात AOP बांधण्यात आल्या […]
अधिक वाचा...