धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : पोलिस भरतीच्या तयारीसाठी स्वप्न उराशी बाळगून अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, युवतीच्या वडिलांनी अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लीना श्रीराम पाटील (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिने […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे शहरातील रात्रीच्या वेळी पबमध्ये चालणारा […]

अधिक वाचा...

पाचगणीमध्ये रिसॉर्टवर पोलिसांचा छापा; बारबालांसह 48 जण ताब्यात…

सातारा : पाचगणीच्या खिंगर येथील ‘पाचगणी टेन्ट हाऊस’ रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला आणि दहा ते बारा बारबालांसह 48 जणांना रविवारी (ता. १८) रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस हॉटेलवर बारबाला नाचवल्या प्रकरणी दहा ते बारा मुलींसह 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झाली ते सर्व […]

अधिक वाचा...

Video: ‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…

पुणे (संदिप कद्रे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून एक लाख रुपये घेताना ओंकार भरत जाधव याला (खासगी व्यक्ती) शनिवारी (ता. 17) पकडण्यात आले. पण, यामुळे एसीपी मुगुटलाल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वाकड) याने देहूरोडच्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे (रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी […]

अधिक वाचा...

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिस याने यूट्युबवरुन घेतले प्रशिक्षण…

मुंबईः मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी यूट्युबवरुन प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे. मॉरिस नोरोन्हा याने साडी वाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलवले होतं. त्यानंतर फेबसबुक लाईव्ह […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलिस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर तीन ते चार गोळीबाराच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता पुणे पोलीस […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लिलाकर असे आरोपीचे नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या नऱ्हे येथील व्हिजन स्कूल जवळील रॉयल काउंटी इमारतीमधील फ्लॅटमध्ये बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रॉयल काऊंटी मध्ये अरुण बबनराव पायगुडे (वय ६४) व त्यांचा मुलगा ओंकार अरुण पायगुडे (वय ३३) हे राहत होते. दोघांमध्ये दारूवरून भांडण होत असल्याची माहिती शेजारी […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर; कारण…

मुंबई : मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक धमकीचा मेसेज आला असून, मुंबईमध्ये मोठा बॉम्ब धमाका होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. धमकीचा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांसह इतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, या धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!