लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटाल याची हत्या…
लाहोर (पाकिस्तान): मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईदवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
बीड: बीड शहरातील स्वराज्य नगर भागात राहात असलेल्या एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेतला. त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. त्यांचा कशाप्रकारे छळ केला जात होता, […]
अधिक वाचा...नोकरीला लावण्याचे आमीष दाखवत प्राध्यापकाची केली आर्थिक फसवणूक…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील पती-पत्नीवर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा शिक्षक मंडळ च्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात ओतुर (ता. जुन्नर) या ठिकाणी निघालेल्या प्राध्यापक भरतीत प्राध्यापकाची नोकरी लावून देतो असे म्हणत बापूसाहेब हरिभाऊ शिंदे या प्राध्यापकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च २०२३ ते […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू…
यवतमाळ : यवतमाळच्या डोंगरखर्डा येथे पाहुणे बनून आलेले दोन मावस भावांचा धुळवडीच्या दिवशी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृत भावांची नावे आहेत. दोघे जण इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. आठ पैकी पाच जण […]
अधिक वाचा...महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण; वाहन कोसळले ८०० फूट खोल दरीत…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय २७) यांना वीरमरण आले आहे. 2019 साली सुनिल विठ्ठल गुजर हे भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सुनिल गुजर यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि सहा महिन्यांचा मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे. सुनिल गुजर यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये […]
अधिक वाचा...केगांव येथील चार आरोपींना ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : केगांव येथे अंगणात कुंपणाचे ताट्या बांधत असतांना एकाच कुटुंबात झालेल्या वादात आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे या ४ आरोपींना भादंवि कलम ३०७ अंतर्गत केळापूर येथील न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹ २००० दंड […]
अधिक वाचा...होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…
पुणे (संदिप कद्रे): देशभर होळी आणि धुलवडीचा सण मोठ्या उत्सवात सुरू आहे. नागरिक सण-समारंभ साजरे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांना नागरिकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर राहून ड्युटी करावी लागत आहे. यामुळे होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी शिळी खायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेपासून पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात हे प्रामुख्याने […]
अधिक वाचा...खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…
बीड : बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे पाडलेलं घर अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना गुरूवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या आगीच्या घटनेमध्ये त्याच्या घरातील काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत, या घटनेमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेचं घराचं मोठं नुकसान झाले आहे. वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसले […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…
पुणे (संदिप कद्रे): हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी उघड केला आहे. पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला होता. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रीक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रांजेक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री घेतली होती. पण, पोलिसांनी तपास करून खोटा बनाव उघड केला […]
अधिक वाचा...आईनं 29व्या मजल्यावरून मुलीला फेकलं अन् आयुष्याचा केला शेवट…
मुंबई: नवी मुंबईच्या पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्या मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकले आणि महिलेनं स्वत: देखील इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला आहे. मायलेकीचा मृत्यू झाल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना पनवेल येथील पळस्पे परिसरातील मॅरेथॉन […]
अधिक वाचा...