पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…

चंदीगड (पंजाब): पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या जवानाला पंजाब पोलिसांनी केली  आहे. नाशिक आर्मी कँटान्मेंटमध्ये तैनात असताना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान हा नाशिकमधील भारतीय लष्कराच्या कँटान्मेंटमध्ये तैनात होता. संदीप सिंह असे हेरगिरी करणाऱ्या जवानाचे नाव आहे. संदीप सिंह याने आयएसआयला नाशिक, जम्मू […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक

न्यूयॉर्क : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अनमोल बिष्णोई याला अमेरिकेत एफबीआयने ताब्यात घेतले आहे. अनमोल हा कुख्यात गँगस्टर लाँरेन्स बिष्णोई याचा भाऊ आहे. अनमोल बिष्णाई याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. त्यानंतर अमेरिकन यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना याची माहिती दिली आहे. एफबीआय आणि […]

अधिक वाचा...

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलीस तिची चौकशी करत आहेत. ठाण्यातील एका युवतीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. पाकिस्तान रावलपिंडी येथे […]

अधिक वाचा...

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…

नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे कीर्ति चक्र मिळाल्याचा कसलाच पुरावा नाही. फोटोवर लावायला कीर्तिचक्र नाही, असे अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटले आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी रायबरेलीत […]

अधिक वाचा...

Video News: PoliceKaka Top 10 Crime News…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… लोणावळा येथील भुशी डॅमवर आलेलं पुण्यातील कुटुंब गेलं वाहून पुणेः पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर गेले होते. रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात 5 जण वाहून गेले. त्यातील […]

अधिक वाचा...

सीमा हैदर हिचा नवरा गुलाम भारतात येणार; मोठं कारण समोर…

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर हिचा नवरा गुलाम हैदर हा भारतात येणार आहे. गुलाम हैदर याने सीमा हैदर, सचिन मीणा आणि त्यांचे वकील डॉक्टर एपी सिंह यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यासंदर्भांत साक्ष देण्यासाठी तो उत्तर प्रदेशातल्या गौतमबुद्धनगरच्या सूरजपूर सेशन कोर्टात आपली साक्ष नोंदवण्यासाठी येणार आहे. मानहाीनीचा खटला दाखल केल्यानंतर […]

अधिक वाचा...

शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नासाठी ‘खुला’; सानिया मिर्झा म्हणाली…

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (वय ४१) याने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शोएब मलिकने सना जावेद हिच्या सोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर शोएबपासून सानियाच्या घटस्फोटाची अफवा खरी ठरली आहे. शिवाय, सानियाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. सानिया हिने शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदनात सानियाची टीम […]

अधिक वाचा...

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात गुरुवारी (ता. 21) दुपारी दहशतवाद्यांनी केलेले्या भ्याड हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले आहेत. करण सिंह यादव, गौतम कुमार, चंदन कुमार आणि रवि कुमार राणा अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लष्कराने हुतात्मा जवानांची पार्थिव शरीरं कुटुंबीयांकडे पाठवली आहेत. या घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी संबंधित हृदयद्रावक […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…

नवी दिल्ली : भारतातून राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतली आहे. वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केलं. पाकिस्तानात गेल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. भारतात परतल्यानंतर अंजू सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय […]

अधिक वाचा...

Video: सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर आधारित ‘कराची टू नोएडा’ पाहा टीझर…

नवी दिल्लीः पाकिस्तानची महिला सीमा हैदर आणि भारतीय नागरिक सचिन मीना या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमित जानी यांनी ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!