
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे…
पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने रविवारी (ता. १९) पहाटे अलिशान पोर्शे कारने युवक-युवतीला चिरडल्याची घटना घडली आणि एक एक घटना उघड होऊ लागली. पुणे_पोलिस तर चर्चेत आलेच पण #आरटीओ विभागाच्या अंदाधुंदी कारभाराचा देखील सर्वेसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत…
पुणे शहरात दुचाकी चालकाने हेल्मेट वापरले नाही म्हणून दणादण पाचशे रुपयांच्या बिलांचे एसएमएस मोबाईलवर येऊन आदळतात. पण, दोन जीव घेऊन सुद्धा १५ तासांमध्ये जामीन मिळत असेल तर खरंच या देशात अवघड आहे. अशा प्रकारचे पोलिस आणि आरटीओ विभागाचे वाभाडे काढणारे मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. खरंच, पोलिस आणि आरटीओ विभाग हा एक चेष्टेचा विषय झाला आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहात नाही.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
आरोटीओ विभाग…
आरटीओ विभागामध्ये प्रवेश केल्यापासूनच एजंटांना सामोरे जावे लागते? याचा अर्थ नेमका काय समजायचा. एजंट शिवाय कोणतेही कामच होत नसेल तर याला जबाबदार कोण? सर्वसामान्य नागरिकांनी किती वेळा चकरा मारायच्या? आपले काम ‘एजंट साहेबां’शिवाय पूर्ण होणारच नाही, याची खात्री झाल्यावर हतबल झालेला सर्वसामान्य नागरिक सर्व सोडून देतो आणि एजंट साहेबांचे पाय धरतो. ही वस्तूस्थिती आहे. आर्थिक लागेबांधे असल्याशिवाय शक्य आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
आरटीओ अधिकारी कार्यालयात दाखवा आणि बक्षिस मिळवा…
आरटीओ अधिकारी कार्यालयात दाखवा आणि बक्षिस मिळवा, अशी सुद्धा चर्चा नागरिकांमध्ये आहे. खरंच, अशी परिस्थिती असेल तर खालचे अधिकारी कोणाला जुमाणणार आणि काम करून देणार का? हा पण एक प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.
एक हतबल झालेला नागरिक…
एका सर्वसामान्य नागरिकाला आपली जुनी कार स्क्रॅपमध्ये काढायची आहे. सरकारी नियमाप्रमाणे रितसर प्रक्रिया पूर्ण करून स्क्रॅपचे पत्र हाती घेण्यासाठी एक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण, आरटीओ कार्यालयातील अंदाधुंद कारभाराचा त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण एजंट साहेबांना पैसे दिले तर काम लगेच होते. पैसे दिले नाही तर? कामच होत नाही, अशी अवस्था या विभागाची झाली आहे का? एक वर्षे झाले संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तर मिळत आहेत. जा ईकडे जा तिकडे, असे जर करावे लागत असेल तर काय समजायचे? कारण, यावर कोणाचा अंकुशच राहिलेला नाही. एक वर्षे झाले कामच झालेले नाही.
ताटकळत उभे राहावे लागते…
विविध कामांसाठी नागरिक विविध विभागांमधील रांगेत ताटकळत उभे राहिलेले दिसतात. संबंधित अधिकाऱ्याची विचारणा केली तर वरिष्ठांकडे गेले आहेत, असे सरकारी उत्तर ऐकायला मिळते. साहेब कधी येतील विचारले तर कोणालाच माहित नसते. सर्वसामान्य नागरिकांनी किती वेळ ताटकाळत उभे राहायचे मग? कारण, यावर लक्ष ठेवायला कोणी जबाबदार अधिकारी आहे का नाही?
अय नाही अहो बालायचे…
एक व्यक्ती अधिकाऱ्याकडे कामासाठी गेली होती. संबंधित अधिकाऱ्याने अय काय काम आहे, असे विचारले. सर्वसामान्य नागरिक असला म्हणून काय झाले. त्यांनी अय नाही अहो बोलायचे म्हणून सुनावले आणि आपण कोण आहोत, याची कल्पना दिल्यावर संबंधित अधिकाऱ्याची बोबली बंद झाली. या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्यासाठी जबाबदार अधिकारी असणेचे गरजेचे आहे.
चहापेक्षा किटली गरम…
अधिकारी तर भेटतच नाहीत. पण, चहापेक्षा किटली गरम असल्याचा अनुभव आरटीओ विभागात येताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणजे यांचे नोकरच आहेत की काय? अशा अविभार्वात भाषा ऐकायला मिळते.
थोडक्यात, आरटीओ विभागातील अनुभव हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मुळीच चांगला नाही. अनेकांच्या तक्रारी आहेत, पण कोणाला सांगणार? कुंपणच जर शेण खात असेल तर बोलून काही उपयोग होणार नाही म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्याने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा एक दिवस गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही.
– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
22/05/2024
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

