भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि […]

अधिक वाचा...

महामार्गावरील खड्ड्यामुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल…

ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात पूजा गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी महामार्गाचे ठेकेदार आणि कंपनीविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजा गुप्ता (वय 27) ही विवाहित महिला पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट मध्ये राहत होती. 9 ऑगस्ट वसईत राहणार्‍या पूजा यांच्या मामेबहिणाचा वाढदिवस होता. त्यासाठी […]

अधिक वाचा...

जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

पुणे: विवाहानंतर जेजुरी देवदर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी आलेल्या कुटुंबाची रिक्षा पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवडजवळ असलेल्या बोरावके मळा येथील वळणावरील एका विहिरीमध्ये पडल्यामुळे नवदाम्पत्यासह एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित विलास शेलार (वय २३), वैष्णवी रोहित शेलार (वय १८), श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू […]

अधिक वाचा...

प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळली…

जालना : संभाजीनगर-जालना रोडवर बसला सोमवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. संभाजीनगर ते जालना रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. एक खाजगी बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चार जण गंभीर आहेत. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस […]

अधिक वाचा...

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

बारामती: बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसकाकाचा आज (सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदीप जगन्नाथ कदम असे निधन झालेल्या हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. संदीप कदम हे पुणे ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत पाटस पोलिस चौकीत कार्यरत होते. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास व्यायामासाठी जात असताना […]

अधिक वाचा...

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

अमरावती : दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. प्रियंका शिरसाट असे मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. या घटनेमुळे पोलिस विभागात शोककळा पसरली आहे. गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड […]

अधिक वाचा...

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

पुणे : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू तर एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या […]

अधिक वाचा...

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…

छत्रपती संभाजीनगर : गर्भवती असलेल्या बहिणीला घेऊन घरी निघालेला भावासह बहिणीचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. एक भाऊ पाच महिन्यांच्या गर्भवती बहिणीला दुचाकीवर बसून घरी घेऊन चालला होता. पण, पाठीमागून वेगात आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. याघटनेत […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीचवर शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास एका कारने पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित वाहनाच्या चालकाविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एका कारने पोलिसांच्या […]

अधिक वाचा...

महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…

कोल्हापूर : महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वरूपा शिंदे असे या आरोग्य सेविकेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोग्यसेविका स्वरूपा शिंदे यांना एक प्रसूतीसाठी कॉल आला होता. एका महिलेची प्रसूती करायची असल्यामुळे त्या घाईघाईने आपल्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. मात्र, रस्त्यात पडलेल्या एका खड्ड्याचा अंदाज […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!