जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]

अधिक वाचा...

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

नांदेड: भारतीय लष्करात असलेल्या जवानाने गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती एकनाथ जायभाये हा स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…

वाशिम : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश काकाराव अढागळे वीरमरण आले आहे. 6 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना हिमस्खलन होऊन त्यांचा उंच डोंगरावरून 1 हजार फुटाहुन अधिक खोल दरीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लष्करी इस्पितळात औषधोपचार सुरू होते. मात्र, रविवारी (ता. […]

अधिक वाचा...

लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या युवकाला पकडण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याने फोटोही काढल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) दक्षिण कमांडकडून मिळालेल्या माहितीवरून, नीरज विक्रम विश्वकर्मा (वय 20, रा. उत्तर प्रदेश) […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. जवान वैभव भोईटे अनंतात विलीन झाले असून, दीड वर्षाच्या लेकीने त्यांना अग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. लडाखमध्ये हुतात्मा झालेल्यांमध्ये एक […]

अधिक वाचा...

लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या […]

अधिक वाचा...

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

नवी दिल्ली: भारतीय लष्करात सेवा करणारा जवान घरी आल्यानंतर कुटुंबियांनी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचे स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत. शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा […]

अधिक वाचा...

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…

मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरजवळ एका आरपीएफ जवानाने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी चेतन या जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून, तपासादरम्यान गोळीबाराचे कारण समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची […]

अधिक वाचा...

जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुंछमध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!