
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने वेगाने महागडी पोर्शे कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर दररोज नवनवीन घडामोड घडत आहे. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना पुणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अगरवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अगरवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढले असून, त्यांना आज (शनिवार) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच आज अल्पवयीन मुलाचीची चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव पोर्शे कारने चिरडले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती किंवा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे. या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाला घटनेसंबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. बाल हक्क न्याय मंडळाचा एक सदस्य चौकशीच्या वेळी उपस्थित असतील. न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या पालकांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, पोर्शे कारच्या अपघातानंतर पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अगरवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी, व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
पुणे पोलिसांकडून विशाल अगरवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग’ असं विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अगरवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अगरवाल पिता-पुत्रावर आहे. पोर्शे कारच्या अपघातानंतर अगरवाल कुटुंबातील चौघांना अटक झाली आहे.

पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…
पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…
ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…
पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…
पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….
पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

