राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस स्टेशन, कायदे आणि त्यांच्या हक्कांविषयी अचूक, सोप्या भाषेत माहिती देणारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक वाचकांच्या मोठ्या पसंतीस उतरले असून, राज्यभरातून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये या पुस्तकाची विशेष मागणी वाढत आहे.

‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाचे लेखक सहाय्यक पोलिस आयुक्त (नि.) अशोक इंदलकर यांनी आपल्या ३३ वर्षांच्या दीर्घ पोलिस सेवेतील अनुभवाच्या आधारे नागरिकांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडली आहे. पत्रकार संतोष धायबर यांनी पुस्तकाची मांडणी आणि माहितीची सुसूत्रता प्रभावीपणे केली असून, ते पुस्तकाचे संपादक आहेत.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार कशी करावी, एफआयआर म्हणजे काय, झिरो एफआयआर, अटक झाल्यानंतर नागरिकांचे हक्क, महिला, ज्येष्ठ नागरिक व अल्पवयीनांसाठी असलेले विशेष कायदे, पोलिसांविरुद्ध तक्रार करण्याची प्रक्रिया, ऑनलाईन तक्रार प्रणाली, महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय तसेच नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाताना कोणती काळजी घ्यावी यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांचा या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

याशिवाय भारतीय पोलिस व्यवस्थेचा इतिहास, पोलिसांचे अधिकार व जबाबदाऱ्या, विविध तपास यंत्रणांची माहिती, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, सावकारी कायदा, नागरिकांचे संविधानिक हक्क, न्यायालयीन निर्णय आणि जागरूक नागरिक होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन अशा एकूण ११ प्रकरणांमधून २०० हून अधिक पानांमध्ये उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.

कायद्याचे प्राथमिक ज्ञान प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक असल्याने हे पुस्तक प्रत्येक घरात, ग्रंथालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि अभ्यासिकांमध्ये असावे, अशी प्रतिक्रिया अनेक वाचक व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुस्तकाची मागणी सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुस्तकाची विक्री होत आहे. ईश्वरी प्रकाशन, पुणे यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘कायद्याची माहिती म्हणजेच स्वतःचे संरक्षण.’ या विचाराला बळ देणारे हे पुस्तक प्रत्येक जागरूक नागरिकासाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरत आहे.

पुस्तकाची माहिती
पुस्तक: पोलिस स्टेशनची पायरी चढताना…
लेखक: अशोक इंदलकर (सहाय्यक पोलिस आयुक्त – नि.)
संपादक: संतोष धायबर
किंमत: ₹४००
पुस्तक खरेदीसाठी संपर्क (WhatsApp): 93712 69949

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!