पुणे शहरातील मांजरी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांच्या मनात बसली भीती…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असताना, आता रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मांजरी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “मांजरी परिसरात पोलिसांचा धाक उरलेला नाही” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ७४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), आर्म अॅक्ट कलम ३(२५), ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय २६, रा. भापकर वस्ती, मांजरी बु.), रामजितसिंग रंजितसिंग टाक (वय २७, हडपसर) आणि अभयसिंग सिकंदरसिंग जुनी (वय २१, फुरसुंगी) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी अभयसिंग याला अटक करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाजवळील भापकर वस्ती, मांजरी येथे ही टोळी एकत्र आली होती. त्यांच्या ताब्यात एक गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, सहा धारदार शस्त्रे, मिरची पूड आणि दोरी आढळून आली. पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शस्त्रबंदीचे आदेश लागू असतानाही या टोळीने प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तपासात या टोळीचा उद्देश फुरसुंगी फाटा आणि सोलापूर रोड परिसरात वाहनचालकांना लुटणे तसेच रात्री सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर दरोडा टाकणे असा असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मांजरी परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी, मारामाऱ्या, शस्त्रबाजी आणि दरोड्याच्या कटांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. रात्रीच्या वेळी नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे,” अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर मांजरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात असून, परिसरात अधिक प्रभावी गस्त, गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार; सिनेस्टाईलने चौघांना ठोकल्या बेड्या…

पुणे शहरात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश…

पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!