Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पुणे तिथे काय उणे – संतोष धायबर, संदीप कद्रे
पुणे शहरातील बंगळूर महामार्गावर वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हॉटेल आणि बार-रेस्टॉरंट आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतरही रात्रीच्या सुमारास पाठामागच्या दाराने सर्वकाही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नशेच्या आहारी गेल्यामुळे दुचाकी चालवता न येणाऱ्या युवकांपासून ते पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न पाहायला मिळाले…
स्थळः बंगळूर महामार्गावरील पाषाण ते नवले पूल
दिनांकः २३ जुलै २०२३
वेळः रात्री साडेबारा ते पहाटे अडीच
पहिले चित्र:
पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी एकाने थेट पोलिसावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पुणे-बंगळूर महामार्गावर विविध हॉटेल्स आणि त्यामध्ये नशेत अडकणाऱ्या तरुणाईबद्दल माहिती मिळाली होती. खरंच, असे काही घडत आहे का? याबद्दलची खातरजमा करण्यासाठी Live Reportingच्या दुसऱ्या भागासाठी पुणे-बंगळूर महामार्ग निवडला होता. या महामार्गावर जो काही अनुभव आले आहेत, तो पुढीलप्रमाणे…
पोलिसकाकांना सलाम…
पुणे-बंगळूर महामार्गावरील बावधान परिसरात एक मोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. रात्रीचा अंधार. कोसळणारा पाऊस आणि वाहनांचा वेग आणि अचानक ट्रकला पाठीमागून धडकत असलेमुळे इतर वाहनांना होत असलेला अपघात…
पुणे-बंगळूर महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक ट्रक बंद पडला होता. ट्रक चालक काही वेळ अंधारात उभा राहून ट्रक बंद असल्याचा इशारा करत होता. पण, काही वेळानंतर तो बाजूला झाला. अंधार, पाऊस आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अपघात होत होते. बंद पडलेल्या ट्रकमुळे चार वाहनांना अपघात झाला. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. पण, वाहनांचे मोठे नुकसान झाले. अंधारामुळे अचानक उभा असलेला ट्रक न दिसल्यामुळे इतर वाहनचालक गडबडत होते. बावधान पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अमोल बुरटे आणि योगेश काळे हे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. भर पावसात उभे राहून इतर वाहनांना अपघात होण्यापासून वाचवत राहिले.
अमोल बुरटे आणि योगेश काळे या दोन पोलिसांनी जीवाची बाजी लावत पावसात उभे राहून इतर वाहनांना इशारा करत राहिले. काही वेळानंतर त्यांनी बंद पडलेल्या ट्रकला बाजूला करण्यासाठी टोईंग व्हॅन बोलवली आणि बंद पडलेला ट्रक बाजूला करण्याचे काम केले. पोलिसांनी खरोखरच मोठा अपघात रोखण्याचे काम केले आहे. कारण, अंधार आणि पावसामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांना बंद पडलेला ट्रक दिसत नव्हता. वेगात अचानक समोर उभा राहिलेल्या ट्रकमुळे चार अपघात झाले. पण, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवला आहे. दोन्ही पोलिसांना सलाम!
——————————————————————————————–
दुसरे चित्र:
पाठीमागच्या दाराने सर्व काही सुरू…
पुणे-बंगळूर महामार्गावर पाषाण ते नवले पुलापर्यंतच्या दोन्ही बाजूंना विविध हॉटेल्स सुरू आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल्स आणि बार, रेस्टॉरंट सुरू असल्याचे पाहायला मिळाले. थोडक्यात पाठीमागच्या दाराने सर्व काही सुरू होते. अर्थात, ‘लक्ष्मी’च्या अशिर्वादाशिवाय सुरू राहू शकत नाहीत, असे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.
हॉटेल्स आणि बार-रेस्टॉरंटसाठी वेळेची मर्यादा आहे. पण, वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत भिनदास्तपणे हॉटेल्स आणि बार-रेस्टॉरंट सुरू असल्याचे पाहायला मिळाले. वेळ संपल्यानंतर पुढील बाजू बंद केली जात होती. पण, पाठीमागील बाजूने उशिरापर्यंत सर्वकाही सुरू असते. मध्यरात्र साडेतीन-चार पर्यंत सुरू असल्याचे एका हॉटेलबाहेर उभा असलेल्या सुरक्षाचालकाने सांगून दुसऱ्या बाजूचा दरवाजाही दाखवला. थोडक्यात, पोलिस एका बाजूला गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मात्र नशेच्या आहारी गेलेली टोळक्यांपासून गुन्हा घडणार नाही, हे कशावरून?
तर्राट दुचाकी चालक…
एका बार-रेस्टॉरंटमधून एक युवक बाहेर पडला. एकदम तर्राट झाला होता. दुचाकी हातात घेतल्यानंतर त्याला काही कळतही नव्हते. पडता-पडता अनेकदा वाचलाही. दुचाकी वेडेवाकडीपणाने चालवत तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. काही अंतरापर्यंतही त्याला वाहन चालवणे अवघड झाले होते. पण, तशाच अवस्थेत तो पुढे-पुढे जात होता. स्वतःच्या जीवाबरोबरच इतरांच्या जीवालाही त्याच्यापासून धोका होऊ शकत होता.
टोळक्याकडून शर्ट काढून पावसात नृत्य…
एका हॉटेलबाहेर आठ-दहा जणांचे टोळके उभे होते. पावसाची रीप-रीप सुरू होती. नशेच्या आहारी गेलेले टोळके अंगातील शर्ट काढून मोठ-मोठ्याने ओरडत नाचत होते. वाहनधारकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. नशेत तर्र असलेल्या टोळक्यापासून गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांवरच हल्ला करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. टोळक्यांपासून अपघाताबरोबरच गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिसांची गस्त…
पोलिस दुचाकीवरून गस्त घालत होते. पोलिसांसोबत संवाद साधत घडत असलेल्या प्रकाराबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करणार असल्याचे सांगून, त्या दिशेने प्रयाण केले.
थोडक्यात, पुणे-बंगळूर महामार्गावरील वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी हॉटेल आणि बार-रेस्टॉरंट सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत आरोपींची मजल जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? यामुळे पुणे पोलिसांना गुन्हेगारी रोखायची असेल तर कारवाई करणे गरजेचे आहे.
(क्रमशः)
– संतोष धायबर, संदीप कद्रे
editor@policekaka.com
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…https://t.co/xF0Q582EqE@PuneCityPolice @PCcityPolice @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @maharashtra_hmo @ChDadaPatil @SantoshDhaybar @CPPuneCity @PuneCityTraffic @CMOMaharashtra pic.twitter.com/X0oMTJ7ozr
— policekaka News (@policekaka) July 24, 2023
अर्थकारण जेथे मोका मिळतो तेथे अर्थकारण व जेथे गरज तेथे कायदा कारण सर्व गोष्टी कायद्याने साध्य होत नाही पुरेसे मनुष्य बल पोलीस खात्यात उपलब्ध नाही