पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या; मुलं झाली पोरकी…
मुंबई : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने तिचा गळा आवळून खूनन केल्याचा आरोप आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीनेही रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन मुलं पोरकी झाली आहेत. आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मजीद हनीफ खान (वय ५०) याने पत्नी तब्बसुम मजीद खान (वय ४१) अशी मृतांची […]
अधिक वाचा...आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह…
नंदूरबार: आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबारमधील विमला हाऊसिंग परिसरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील एका वीस वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत मुलगी ही नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. पण, मुलीचा घातपात झाल्याचा तिच्या पालकांचा आरोप आहे. मुलीच्या वस्तीगृह प्रवेश आणि पालक कागदपत्रावर तिच्या […]
अधिक वाचा...पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सूनेची आत्महत्या; परिसरात खळबळ…
पुणे: पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पायल अक्षय झांबरे (वय २९) असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींकडून हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पायल यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची […]
अधिक वाचा...माजी जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल….
पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरोधात भारतीय सैन्यदलाची प्रतिमा मलिन होईल, अशी विधाने करून व्हिडिओ लिंक प्रसारित केल्याबद्दल नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नायब सुभेदार एमटेक बी व्हेईकल्स ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर सचिन गंगाधर गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की […]
अधिक वाचा...मुग्धा लंडनहून गुपचूप आली पुण्यात अन् मृत्यू; चक्रावून सोडणारा घटनाक्रम…
पुणे: लंडन येथे एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील मुग्धा अविनाश देशमुख (वय ३४) या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, मुग्धाने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुग्धाच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले, ज्यामध्ये भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! IT इंजिनिअरच्या पत्नीची आठ पानांची चिठ्ठी; तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा…
पुणे: एका IT इंजिनिअरच्या पत्नीने मणक्याच्या आजाराला कंटाळून आपल्या सहा वर्षीय मुलासह १८व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकता बांगड (वय ३३) आणि माधव बांगड (वय ६) अशी मृत आई आणि मुलाची नावं आहेत. एकता यांनी आत्महत्येपूर्वी सात ते आठ पानांची सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी पती मनोज यांच्याविषयी […]
अधिक वाचा...पुणे! सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे : सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर एका बंद कारमध्ये साधारण युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी बेवारस अवस्थेत उभी होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक चारचाकी वाहन गेल्या दोन-तीन दिवसांपासून उभे होते. संबंधित कारमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ […]
अधिक वाचा...मुग्धा लंडनमध्येच असल्याचे भासवत होती; पुण्यात आढळला मृतदेह…
पुणे: मुग्धा अविनाश देशमुख (वय 34) हिचा पुण्यातील एका बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेलेली मुग्धा दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता भारतात परतली होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुग्धा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलिसांकडे धाव घेतली होती. अपहरणाच्या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये भोंदूबाबाने आश्रमातच ओलांडली मर्यादा; महिलेवर लैंगिक अत्याचार…
नाशिक: नाशिक शहरामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नाशिक जिल्ह्याच्या येवला परिसरातून असाच प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित महिला आरोपीच्या आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार […]
अधिक वाचा...युवतीसोबत दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न अन् लग्न मंडपात जोरदार राडा…
नाशिक : पहिल्या पत्नीसोबतचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात प्रलंबित असतानाच एकाने दुसऱ्या युवतीसोबत दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिल्या पत्नीने थेट लग्न मंडपात धाव घेऊन जोरदार राडा घातला. या प्रकरणी पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाचं पहिलं लग्न झालं होतं. मागील काही काळापासून […]
अधिक वाचा...
