आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी…
नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळ यांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी दिली. […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…
नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि त्यातल्या त्यात पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील पंचवटी परिसरात सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावर गावगुंडांनी थेट हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी प्रकाश नेमाने सोमवारी (ता. ११) रात्री कर्तव्य संपल्यानंतर घरी जात असताना काही टवाळखोरांचा गट […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
नाशिक : नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...हॅलो, तिकीटासाठी 50 लाख द्या, आमदाराला दिल्लीतून फोन; दोघे ताब्यात…
नाशिक : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि इच्छुकांना उमेदवारीची फेक ऑफर दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन तोतया अधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सर्वेश मिश्रा आणि गौरव नाथ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळवून देण्यासाठी 50 लाख […]
अधिक वाचा...ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…
नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…
नाशिक : नाशिकमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री घडली आहे. पंचवटी पोलिस स्थानकात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. खडकी या ठिकाणी एका रस्त्यावर एक टोळके दहशत निर्माण करत होते. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…
नाशिक : नाशिक शहरातील सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका युवकाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोयता गँगने परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये अॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू…
पुणेः कार व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार (ता. 24) बिरदवडी फाटा ते पुणे नाशिक महामार्ग दरम्यान घडला आहे. हर्षदा केतन खानेकर (वय 27 सध्या रा. भायखळा मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या […]
अधिक वाचा...नाशिक शहर पोलिसांनी काढली गावगुडांची धिंड…
नाशिकः घरांवर दगडफेक करत दहशत माजविणार्या गावगुडांची नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (ता. २२) सदगुरुनगरमध्ये धिंड काढली. गावगुंडांनी जिथे दहशत माजवली तिथेच गुंडांचा पोलिसांनी माज उतरवल्याने नागरिकांना आनंद झाला. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अरुण बंडी (वय २७) व महेश सोनवणे (२१) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास…
नाशिक : नाशिक शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिता संजय पाटील (वय 18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या […]
अधिक वाचा...