पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाललाआता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अगरवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अगरवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील विशाल अगरवालसोबत सर्वच सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अगरवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात. या प्रकरणात विशाल अगरवाल जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

दरम्यान, विशाल अगरवालवर पुणे पोलिसांकडून आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता असे पोलिसांना खोटं सांग’ असे विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात येणार आहे

विशाल अगरवालवर आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा दाखल करण्यात येणार.

पुणे पोलिसांनी अपघाती गाडीचा संपूर्ण मार्ग तपासला आहे. 19 मे रोजी ती गाडी अगरवाल यांच्या घरातून किती वाजता बाहेर पडली याचा देखील तपास केला. घरातून कोसी, तिथून ब्लॅक आणि तिथून अपघात स्थळापर्यंत संपूर्ण मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. अपघात झालेली महागडी गाडी ही अगरवाल याच्या कंपनीच्या नावावर आहे. ती गाडी सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे.

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!